Suryakumar Yadav On Pakistan Reporter With Witty Remark : भारतीय संघाने पाक विरुद्धच्या ऐतिहासिक सामन्यात ५ विकेट्सने विजय मिळवत नवव्यांदा आशिया कप स्पर्धा जिंकली. आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात ४१ वर्षांत पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात जेतेपदाची लढत रंगल्याचे पाहायला मिळाले. पाक विरुद्धच्या पहिल्या लढतीपासून ते फायनलमधील अखेरच्या अन् तिसऱ्या लढतीपर्यंत भारतीय संघाने पाकिस्तान खेळाडूंपासून चार हात लांब राहण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर टीम इंडियाने फायनल जिंकल्यावर ट्रॉफीही स्वीकारली नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वादग्रस्त मुद्यावरून पाक पत्रकाराचा भारतीय कर्णधाराला बाउन्सर
भारत-पाक यांच्यातील लढतीदरम्यान वादग्रस्त ठरलेल्या मुद्यावरून पाकिस्तानी पत्रकाराने सूर्यकुमार यादव याच्यावर राजकारण केल्याचा थेट आरोप केला. पण सूर्यकुमार यादवनं या प्रश्नावर हसत हसत रिप्लाय देत पाकिस्तानी पत्रकाराची बोलती बंद केल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानी पत्रकाराने सूर्याला नेमकं कोणते प्रश्न विचारले? सूर्यानं त्याला कसा रिप्लाय दिला जाणून घेऊयात सविस्तर
Asia Cup Winner Indian Captains : सूर्यकुमार यादव थेट MS धोनीच्या पंक्तीत
तू चॅम्पियन झालास, पण राजकारण केलंस; पाक पत्रकाराचा आरोप अन्...
आज तू चॅम्पियन झालास. चांगले खेळलास. पण स्पर्धेदरम्यान पाकिस्तानी संघासोबतचे तुझे वर्तन प्रश्न उपस्थितीत करणारा होता. आधी पाकिस्तानी संघासोबत हस्तांदोलन करण्यास टाळले. त्यानंतर ट्रॉफी फोटो सेशनला नकार दिला. स्वतंत्र पत्रकार घेतली, असा घटनाक्रम सांगत पाक पत्रकाराने सूर्यकुमार यादवला क्रिकेमध्ये राजकारण आणणारा पहिला कर्णधार आहेस, असे म्हटले. यावर सूर्यकुमार यादवनं नेमका प्रश्न काय? एकाच वेळी चार प्रश्न विचारलेत. तुम्हाला राग आलाय का? असा प्रतिप्रश्न करत सूर्यकुमार यादवनं पाक पत्रकाराचीच फिरकी घेतली.
कुणाच्या सांगण्यावरून काहीच केलं नाही, मैदानातच सगळं ठरलं!
आणखी एका पत्रकाराने बीसीसीआयचा ई मेल आल्यावर सगळं ठरलं का? असा प्रश्नही विचारला. यावर सूर्यकुमार यादवनं जो निर्णय घेण्यात आला तो निर्णय मैदानात आम्हीच घेतला, असे सांगत आम्ही कुणाच्या सांगण्यावरून हे केले नाही, असेही स्पष्ट केले.