Sahibzada Farhan On Gun Firing Celebration Says MS Dhoni And Virat Kohli Have Also Done It :आशिया चषक २०२५ स्पर्धेत भारत-पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ तिसऱ्यांदा एकमेकांना भिडणार आहेत. आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही संघात जेतेपदाची लढाई रंगणार आहे. याआधी भारतीय संघाने साखळी फेरीसह सुपर फोरमध्येही पाकला त्यांची जागा दाखवून दिलीये. फायनलमध्ये शेजाऱ्यांचा भारतीय संघासमोर निभाव लागणार नाही. कारण पाकच्या तुलनेत भारतीय संघ फक्त भारी नाही तर कामगिरीही तशीच राहिलीये. या सामन्याआधी दोन्ही देशांतील खेळाडू शिस्तभंगाच्या आरोपामुळे चर्चेत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
फायनलआधी सूर्यासह पाकचा साहिबजादा अन् हारिस रौफ शिस्तभंग प्रकरणामुळे चर्चेत
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने पाक विरुद्धच्या सामन्यानंतर पहलगामच्या मुद्यावर केलेले भाष्य आक्षेपार्ह आहे, असा आरोप करत ICC कडे दाद मागितलीये. दुसरीकडे भारतीय क्रिकेट मंडळाने (BCCI) सुपर फोरमधील लढतीत गन सेलिब्रेशन करणाऱ्या साहिबजादा आणि हारिस राउफ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सूर्यकुमार यादवसह पाकिस्तानच्या खेळाडूंनीही आयसीसी कार्यालयात आपली आपली बाजू माडंली आहे. सूर्यकुमार यादवनं आपल्या वक्तव्यावर ठाम राहत जे बोललो त्यात राजकीय हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण दिले आहे. गन सेलिब्रेनमुळे वादात अडकलेल्या पाकचा सलामीवीर साहिबजादा याने आपल्या बचावासाठी विराट कोहली आणि धोनीचं नाव घेतल्याची माहिती समोर येत आहे.
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
पाकिस्तानच्या सलामीवीरानं बचावासाठी घेतलं MS धोनी अन् कोहलीचं नाव
इंडिया टुडेनं सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, आयसीसीच्या सुनावणी वेळी साहिबजादा फरहान याने आपली बाजू मांडताना गन सेलिब्रेशन करण्यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता अशी भूमिका मांडलीये. कुणालाही उसकावण्यासाठी असं सेलिब्रेशन केलेले नाही, असे सांगताना त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या दिग्गजांची नावेही घेतली आहेत. क्रिकेटच्या मैदानात धोनी आणि कोहली यांनीही अशा प्रकारचे सेलिब्रेशन केल्याचा दाखला देत त्याने वादग्रस्त प्रकरणात भारतीय दिग्गजांचा ढालीप्रमाणे वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.
MS धोनी अन् कोहलीनं गन सेलिब्रेशन केलं होतं ही गोष्ट खरीये, पण...
विराट कोहली हा मैदानातील आपल्या हटके सेलिब्रेशनमुळे नेहमची चर्चेत राहिला आहे. किंग कोहलीनं २०२४ च्या आयपीएल हंगामातील पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात गन सेलिब्रेशन केल्याचे पहायला मिळाले होते. यामागचं कारण होतं ते रायली रॉसू. RCB विरुद्धच्या सामन्यात पंजाबकडून या पठ्ठ्यानं अर्धशतक झळकावल्यावर गन सेलिब्रेशन केले . मग त्याची विकेट मिळाल्यावरआनंद व्यक्त करताना कोहलीनं आपल्या हाताची बंदूक करत गन सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले होते. याशिवाय महेंद्रसिंह धोनीनं श्रीलंकेविरुद्ध १८३ धावांची धडाकेबाज खेळी केली त्यावेळी शतकानंतर त्याने या धाटणीत आनंद व्यक्त केला होता. पण हा दाखला देऊन त्याची चूक पोटात घालण्याजोगी निश्चित नाही. कारण भारत-पाक यांच्यात तणावपूर्ण वातावरण असताना दोन्ही संघ मैदानात उतरले आहेत. या परिस्थितीत त्याचे सेलिब्रेशन हे खटकणारे अन् 'नापाक' ठरलं अन् त्यावर संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या.
Web Title : IND vs PAK: गन सेलिब्रेशन विवाद; पाकिस्तानी बल्लेबाज ने लिया धोनी, कोहली का नाम।
Web Summary : एशिया कप में भारत-पाक मुकाबला गरमाया। गन सेलिब्रेशन विवाद में फंसे पाकिस्तानी खिलाड़ी ने आईसीसी सुनवाई में धोनी और कोहली के पुराने सेलिब्रेशन का हवाला दिया।
Web Title : IND vs PAK: Gun celebration row; Pakistani batsman invokes Dhoni, Kohli.
Web Summary : Asia Cup heats up with India-Pakistan rivalry. A Pakistani player, embroiled in a gun-celebration controversy, cited Dhoni and Kohli's past celebrations in his defense during an ICC hearing.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.