IND vs PAK Asia Cup Final : टीम इंडियाने काल दुबंईमध्ये जोरदार खेळी करत पाकिस्तानचा पराभव केला. आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आशियाई क्रिकेट परिषद (ACC) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याविरुद्ध निषेध नोंदवला. टीम इंडियाने त्यांच्याकडून आशिया कप ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. हे नाट्य सुमारे २ तास चालले. त्यानंतर मोहसिन नक्वी निघून गेले आणि ट्राफीही कोणीतरी घेऊन गेले. आता, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव देवजीत सैकिया यांनी मोहसिन नक्वी यांच्यावर आशिया कप ट्रॉफी तसेच टीम इंडियाचे पदके हिसकावून घेतल्याचा आरोप केला आहे.
याबाबत, बीसीसीआय पुढील महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) बैठकीत नक्वी यांच्याविरुद्ध निषेध नोंदवणार आहे.
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
भारत पाकिस्तानचा निषेध करणार
देवजीत सैकिया यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतमीमध्ये मोहसिन नक्वी यांचा निषेध नोंदवणार असल्याचे सांगितले. "आम्ही एसीसी अध्यक्षांकडून ट्रॉफी स्वीकारण्याचा निर्णय घेतला नव्हता, ते पाकिस्तानच्या सर्वात प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. पण याचा अर्थ असा नाही की ते पदकांसोबत ट्रॉफी घेऊन जातील. हे खूप दुर्दैवी आहे, अतिशय अन्याय्य आहे आणि आम्हाला आशा आहे की ट्रॉफी आणि पदके लवकरात लवकर भारतात परत केली जातील. आम्ही नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसी परिषदेत याचा निषेध करू, असंही देवजीत सैकिया म्हणाले.
"आपल्या सशस्त्र दलांनी सीमावर्ती भागात हे केले आहे आणि आता दुबईमध्येही तेच घडले आहे. म्हणून हा एक उत्तम क्षण आहे, भारतीय क्रिकेटसाठी एक महत्त्वाचा प्रसंग आहे. आधी ऑपरेशन सिंदूर होते आणि आता ऑपरेशन किला आहे. म्हणून काही शत्रू देशांनी केलेल्या सर्व कृतींना हे योग्य उत्तर आहे. म्हणून मला वाटत नाही की दुबईतील अंतिम सामन्याच्या भव्य प्रसंगी यापेक्षा चांगला प्रतिसाद असू शकेल",असे देवजीत सैकिया म्हणाले.
पाकिस्तान विरोधात खेळण्याचे कारण सांगितले
"बीसीसीआयने सर्व खेळांबाबत भारत सरकारने घालून दिलेल्या भावना आणि धोरणाचे पालन केले आहे. म्हणून, जेव्हा द्विपक्षीय स्पर्धा असते तेव्हा भारत पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही शत्रू देशाविरुद्ध खेळणार नाही. आणि बीसीसीआय गेल्या १२-१५ वर्षांपासून हे करत आहे. सरकारने म्हटले आहे की बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये, मग ते क्रिकेट असो किंवा फुटबॉल, आम्हाला खेळावेच लागेल. अन्यथा, आंतरराष्ट्रीय महासंघांकडून संघावर बंदी घातली जाईल. म्हणून, आम्ही केंद्र सरकारच्या धोरणाचे पालन केले," असे सैकिया म्हणाले.
म्हणून आम्ही पाकिस्तान विरोधात खेळलो
"बीसीसीआयने (BCCI) सर्व खेळांबाबत भारत सरकारने घालून दिलेल्या धोरणाचे पालन केले आहे. म्हणून, ज्यावेळी द्विपक्षीय स्पर्धा असते तेव्हा भारत पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही शत्रू देशाविरुद्ध खेळणार नाही. आणि बीसीसीआय गेल्या १२-१५ वर्षांपासून हे करत आहे. सरकारने म्हटले आहे की बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये, मग ते क्रिकेट असो किंवा फुटबॉल, आम्हाला खेळावेच लागेल. अन्यथा, आंतरराष्ट्रीय महासंघांकडून संघावर बंदी घातली जाईल. म्हणून, आम्ही केंद्र सरकारच्या धोरणाचे पालन केले," असे सैकिया म्हणाले.