Asia Cup 2025 IND vs Oman, Shubman Gill Is Another KL Rahul टीम इंडियातील प्रिन्स अन् भारतीय टी-२० संघाचा उप कर्णधार शुबमन गिल ओमानविरुद्ध अपयशी ठरला. संजू सॅमसनला मागे ठेवून सलामीवीराच्या रुपात भारतीय संघाने त्याला पहिली पसंती दिलीये. पण ओमानसारख्या संघाविरुद्धही त्याला चमक दाखवता आली नाही. या सामन्यात ८ चेंडूचा सामना करून तो अवघ्या ५ धावांवर माघारी फिरला. भारताच्या डावातील दुसऱ्या षटकात ओमानच्या डावखुरा जलदगती गोलंदाज फैजल शाहनं अप्रतिम चेंडूवर गिलला चकवा देत त्याला क्लीन बोल्ड केले. कॅज्युएली अप्रोचमुळे गिलच्या पदरी निराशा आली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बोल्ड झाल्यावर शुबमन गिल ट्रोल
ओमान सारख्या संघाविरुद्ध त्याने स्वस्तात विकेट गमावल्यावर सोशल मीडियावर शुबमन गिल ट्रोलही होताना दिसतोय. अनेकांनी तो भारतीय टी-२० संघातील दुसरा केएल राहुल आहे, अशी तुलना करत युवा बॅटरला ट्रोल केल्याचे दिसून येते. यामागचं कारण म्हणजे तो संयमी पवित्रा घेत खेळताना दिसले. एवढेच नाही तर तो सेम टू सेम केएल राहुलसारखे बाद झाला.
T20 Asia Cup Record : श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं मोडला हिटमॅनचा रेकॉर्ड; विराट टॉपला, पण...
युवा ओपनर बॅटरची KL राहुलशी तुलना; पण का?
२०२१ च्या टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केएल राहुल अगदी गिलप्रमाणेच आउट झाला होता. फरक फक्त एवढा की, केएल राहुल हा शाहीन आफ्रिदीनं टाकलेल्या १४५ kph वेगाने आलेल्या चेंडूव फसला होता. दुसरीकडे गिलवर १३० kph वेगाने आलेल्या चेंडूवर ही वेळ आली.
शुबमन गिलची आशिया कप स्पर्धेतील कामगिरी
आशिया कप स्पर्धेत शुबमन गिलला वर्षभरानंतर आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅकची संधी मिळाली आहे. UAE विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने ९ चेंडूत नाबाद २० धावांची खेळी केली होती. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात तो ७ चेंडूत १० धावा करून माघारी फिरला होता. आता ओमान विरुद्ध त्याला दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही. ज्या सलामीवीराकडून एका डावात ५० पेक्षा अधिक धावांची अपेक्षा आहे त्या शुबमन गिलनं तीन सामन्यात मिळून फक्त ३७ धावा केल्या आहेत.