I Have Become Like Rohit Suryakumar Yadav’s Hilarious Quip After Forgetting Name Who Is India’s Playing 11 : अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर आशिया चषक स्पर्धेतील साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळवण्यात येत आहे. ओमान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अन् गंमतच झाली! सूर्यकुमारला संघात कुणाला घेतलंय त्याचं नावच आठवेना! रोहितच्या नावे फाडलं बिल
भारतीय संघ या सामन्यात दोन बदलासह मैदानात उतरल्याचे त्याने टॉस नंतर स्पष्ट केले. पण हर्षित राणाच नाव घेतल्यावर दुसरा बदल कोणता केलाय ते नावचं त्याला आठवेना. त्याने ते आठवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला नाव आठवले नाही. शेवटी त्याने रोहित शर्मावर बिल फाडलं. ओह माय गॉड माझंही रोहित सारखं झालंय असे तो म्हणाला. भारतीय संघाचा माजी कर्णधार टी-२० आणि कसोटी कर्णधार रोहित शर्माचा टॉस वेळी बऱ्याच वेळा विसरभोळा स्वभाव दिसून आला आहे. तिच गोष्ट ओमान विरुद्धच्या सामन्यावेळी सूर्यकुमार यादवसंदर्भात घडली अन् क्रिकेट चाहत्यालाच नव्हेत तर या गोष्टीनंतर खुद्द सूर्यालाही रोहित आठवल्याचे दिसून आले.
T20 Asia Cup Record : श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं मोडला हिटमॅनचा रेकॉर्ड; विराट टॉपला, पण...
कुणाचं नाव विसरला सूर्या!
ओमान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघानं जे दोन बदल केले आहेत त्यात सूर्यानं सांगितल्याप्रमाणे हर्षित राणासह अर्शदीप सिंगला संधी देण्यात आली आहे. हे दोघेही आशिया कप स्पर्धेतील पहिला सामना खेळत आहेत. वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह या दोघांना विश्रांती देण्यात आली आहे.
ओमान विरुद्ध भारतीय प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुबमन गिल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
Web Title: IND vs Oman I Have Become Like Rohit Suryakumar Yadav’s Hilarious Quip After Forgetting One Of India’s Changes vs Oman in Asia Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.