IND vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना आज (9 मार्च) दुपारी 2.30 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवता जात आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. सामन्यापूर्वी सट्टा बाजारातील वातावरण तापले आहे. रिपोर्ट्सनुसार, या सामन्यासाठी तब्बल 5000 कोटी रुपयांचा सट्टा आधीच लावला गेला आहे.
सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत किमान पाच मोठ्या बुकींना पकडले आहे. अटक केलेल्या बुकींची चौकशी केल्यानंतर तपासात दुबईचा अँगल समोर आला. सट्टेबाजांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे. पोलिसांनी बेटिंगमध्ये वापरण्यात येणारी अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि वस्तूही जप्त केल्या आहेत.
रिपोर्टनुसार, दाऊद इब्राहिमची 'डी कंपनी' दुबईतील मोठ्या क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजी करण्यात नेहमीच गुंतलेली असते. अशा शानदार सामन्यांच्या वेळी अनेक बडे बुकी शहरात हजेरी लावतात आणि सट्टा चालवतात.
कोण होणार चॅम्पियन?
आंतरराष्ट्रीय सट्टेबाजी बाजारानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा विजेता टीम इंडिया असेल. सट्टेबाजांच्या म्हणण्यानुसार, टीम इंडिया या संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिली असून, सर्व सामने याच मैदानावर खेळले गेले आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यातही टीम इंडिया जिंकण्याची दाट शक्यता आहे.
चुरशीची लढत होणार
टीम इंडियाने ग्रुप मॅचमध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा पराभव करून आणि सेमीफायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडने पाकिस्तान आणि बांगलादेशचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा एकतर्फी सामना जिंकून अंतिम फेरीचे तिकीट मिळवले.
सध्या दोन्ही संघ मजबूत दिसत असून फिरकीचा विचार करता, दोन्ही संघांकडे चांगले गोलंदाज आणि फलंदाज आहेत. अशा परिस्थितीत न्यूझीलंडचे आव्हान पेलणे टीम इंडियासाठी इतके सोपे नसेल. टीम इंडियाने शेवटचे 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती, त्यानंतर 2017 च्या फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
Web Title: IND vs NZ: Who will win? 5000 crores on the Champions Trophy final..!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.