IND vs NZ T20 WC 2026 Final : मिचेल सँटनरचं भारतीय चाहत्यांचे मन दुखावणारे वक्तव्य, म्हणे...(VIDEO)

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाला भिडण्याआधी  मिचेल सँटनर याने मोठे वक्तव्य केले आहे. टीम इंडियाला ओपन चॅलेंज देताना त्याने भारतीय चाहत्यांनाही डिवचले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 17:51 IST2026-03-07T17:36:02+5:302026-03-07T17:51:58+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs NZ T20 World Cup 2026 Final Mitchell Santner Says Might Break A Few Hearts To Lift The Trophy For Once Ahead Summit Clash Against India | IND vs NZ T20 WC 2026 Final : मिचेल सँटनरचं भारतीय चाहत्यांचे मन दुखावणारे वक्तव्य, म्हणे...(VIDEO)

IND vs NZ T20 WC 2026 Final : मिचेल सँटनरचं भारतीय चाहत्यांचे मन दुखावणारे वक्तव्य, म्हणे...(VIDEO)

IND vs NZ T20 World Cup 2026 Final Mitchell Santner : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी टी २० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना रंगणार आहे. न्यूझीलंडच्या संघासाठी यंदाचा हंगाम हा चढ उतार दाखवणारा राहिला. पण उपांत्य फेरीत त्यांनी अपराजित दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभूत करत अंतिम फेरी गाठली. या विजयामुळे कर्णधार मिचेल सँटनरचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. ८ मार्चला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाला भिडण्याआधी  मिचेल सँटनर याने मोठे वक्तव्य केले आहे. टीम इंडियाला ओपन चॅलेंज देताना त्याने भारतीय चाहत्यांनाही डिवचले आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

काही भारतीयांची मन दुखावली तरी...

भारतीय संघाविरुद्धच्या अंतिम लढती आधी मिचेल सँटनर याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी स्टँटनर म्हणाला की, भारतीय संघ यंदाच्या हंगामातील जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात असला तरी आम्ही सर्वोत्तम कामगिरीवर भर देऊ. आम्ही ट्रॉफी जिंकल्यामुळे काही  भारतीय चाहत्यांची मन दुखावली तरी चालेल. कारण आम्हाला पहिले वहिले जेतेपद जिंकायचं आहे. मिचेल सँटनर याला ज्यावेळी खेळपट्टीसंदर्भात प्रश्न विचारला त्यावेळी तो म्हणाला की, अजूनही खेळपट्टीवर कव्हर आहे. त्यामुळे खेळपट्टी पाहिलेली नाही. खेळपट्टी सपाट असेल, असा अंदाज व्यक्त करताना इथं धावांची बरसात होईल, असे मत त्याने व्यक्त केले.

T20 WC 2026 Final ... तर ते 'चोकर्स' ठरतील! भारत-न्यूझीलंड यांच्यातील फायनलसंदर्भात डेल स्टेनची भविष्यवाणी

फक्त बुमराहचा विचार करुन चालणार नाही

यावेळी मिचेल सँटनर याला जसप्रीत बुमराहसंदर्भातील प्रश्नही विचारण्यात आला होता. यावर न्यूझीलंडचा कर्णधार म्हणाला की, बुमराह हा जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यात त्याने सामन्याला कलाटणी देणारा स्पेल टाकला. पण फक्त तो एकटा धोकायक ठरेल, असा विचार करण्यापेक्षा टीम इंडियातील अन्य खेळाडूंना रोखण्याचेही चॅलेंज असेल, हे देखील त्याने बोलून दाखवले.

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडचा दबदबा 

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत भारत-न्यूझीलंड यांच्यात तीन सामने झाले आहेत. या सर्व सामन्यात न्यूझीलंडने बाजी मारली आहे. ICC स्पर्धेत न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघाला अनेकदा दमवलं असले तरी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत करत ट्रॉफी जिंकली होती. यावेळीही त्याची पुनरावृत्ती करून दाखवत टीम इंडिया नवा इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

Web Title : IND vs NZ T20 WC Final: मेगा फाइनल से पहले सैंटनर का बड़ा बयान

Web Summary : भारत के खिलाफ टी20 विश्व कप फाइनल से पहले, न्यूजीलैंड के कप्तान मिचेल सैंटनर ने कहा कि वे जीतना चाहते हैं, भले ही इससे भारतीय प्रशंसक निराश हों। उन्होंने बुमराह के खतरे को स्वीकार किया लेकिन पूरी भारतीय टीम पर ध्यान केंद्रित करने पर जोर दिया। न्यूजीलैंड का टी20 विश्व कप में भारत पर दबदबा रहा है, लेकिन भारत इतिहास बदलना चाहता है।

Web Title : IND vs NZ T20 WC Final: Santner's Bold Statement Before Mega Final

Web Summary : Ahead of the T20 World Cup final against India, New Zealand captain Mitchell Santner aims to win, even if it upsets Indian fans. He acknowledged Bumrah's threat but stressed focusing on the entire Indian team. New Zealand has historically dominated India in T20 World Cups, but India seeks to rewrite history.