Join us

नेट्स सेशन वेळी 'गायब'; पुन्हा 'दिल' जिंकण्यासाठी गिलची नेक्स्ट डे अन् रेस्ट डेला तगडी प्रॅक्टिस!

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मासह आणि उप कॅप्टन शुबमन गिल ही सलामी जोडी मैदानात उतरणार की, नाही हा प्रश्न चर्चेत आला होता. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 12:18 IST

Open in App

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या हंगामातील स्पर्धेला धमाक्यात सुरुवात करणाऱ्या टीम इंडियासमोर आता न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. 'अ' गटातील अव्वलस्थानासाठी भारत-न्यूझीलंड दोन्ही संघ रविवारी, २ मार्चला दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात उतरणार आहेत. या सामन्याआधी भारतीय संघाला आठ दिवसांचा ब्रेक मिळाला असून या काळात संघातील खेळाडूंनी कसून सराव केल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मासह आणि उप कॅप्टन शुबमन गिल ही सलामी जोडी मैदानात उतरणार की, नाही हा प्रश्न चर्चेत आला होता. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

रोहितचं माहिती नाही, पण गिलची पुन्हा 'दिल' जिंकण्यासाठी करतोय मेहनत

रोहित शर्मा स्नायू दुखापतीमुळे बाकावर बसल्याचे दिसू शकते, अशी माहिती समोर आली होती. दुसरीकडे शुबमन गिलही आजारी असल्यामुळे तो खेळेल की, नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. पण आता शुबमन गिलसंदर्भात टीम इंडियाला अन् भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी 'शुभ बातमी' आलीये. शुबमन गिलनं न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्याआधी नेट्समध्ये दोन तासहून अधिक सराव केला. ही गोष्ट तो फिट असल्याचे संकेत देणारी आहे. रोहित शर्मा खेळणार की, नाही हे अजून गुलदस्त्यात असले तरी गिल किंवी विरोधात मोठं बिल फाडून पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट चाहत्यांच 'दिल' जिंकण्यासाठी तयार आहे.

दोन तासांहून अधिक काळ नेट्समध्ये सराव करताना दिसला शुबमन गिल

क्रिकबझच्या वृत्तानुसार, शुबमन गिलनं गुरुवारी नेट्समध्ये दोन तासांहून अधिक वेळ सराव केला. दुबईतील ICC सेंटरमध्ये त्याच्यासोबत भारतीय संघाच्या ताफ्यातील दोन थ्रो डाउन स्पेशलिस्ट रघु आणि नुवान हे देखील उपस्थितीत होते. एवढेच नाही तर सहाय्यक कोच अभिषेक नायरही त्याच्यासोबत स्पॉट झाला. नेट्समधील त्याची तगडी प्रॅक्टिस आगामी सामन्यासाठी तो पूर्णत: फिट असल्याचे संकेत देणारा आहे. या सीनमुळे तो आजारी असल्यामुळे खेळणार की नाही? या चर्चित प्रश्नालाही पूर्ण विराम लागला आहे.

नेट्स सेशन वेळी गायब, पण विश्रांतीच्या दिवशी तगडी प्रॅक्टिस

गुरुवारी भारतीय संघासाठी विश्रांतीचा दिवस होता. बुधवारी मात्र रात्रीच्या सत्रात जवळपास तीन तास भारतीय खेळाडूंनी सराव केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी गिल दिसला नव्हता. त्यामुळेच तो न्यूझीलंड विरुद्ध खेळणार की, नाही? हा प्रश्न चर्चेत आला होता. पण विश्रांतीच्या दिवशी तो नेट्समध्ये उतरल्यामुळे न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी तो उपलब्ध असेल, हे आता स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे भारतीय संघाच्या नेट प्रॅक्टिस पासून रोहित शर्मा मात्र लांबच राहिला. त्यामुळे तो बाकावर बसल्याचे दिसू शकते. 

टॅग्स :शुभमन गिलरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध न्यूझीलंडचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५