IND vs NZ : श्रेयस अय्यरचे शतक अन् रोहितचे भन्नाट सेलिब्रेशन; भारतीय कर्णधाराचा Funny Video Viral

IND vs NZ, 1st Semi-Final : वन डे विश्वचषकातील पहिला उपांत्य फेरीचा सामना आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 07:14 PM2023-11-15T19:14:40+5:302023-11-15T19:18:44+5:30

whatsapp join usJoin us
   IND vs NZ Shreyas Iyer's century and indian captain Rohit sharma's  funny celebration going viral on social media  | IND vs NZ : श्रेयस अय्यरचे शतक अन् रोहितचे भन्नाट सेलिब्रेशन; भारतीय कर्णधाराचा Funny Video Viral

IND vs NZ : श्रेयस अय्यरचे शतक अन् रोहितचे भन्नाट सेलिब्रेशन; भारतीय कर्णधाराचा Funny Video Viral

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs NZ Live Match Updates In Marathi | मुंबई : वन डे विश्वचषक २०२३ मध्ये सलग नऊ विजय मिळवून उपांत्य फेरी गाठलेल्या भारतीय संघाने चमकदार कामगिरी करून फायनलचे तिकिट मिळवण्यासाठी न्यूझीलंडला कडवी झुंज दिली. न्यूझीलंडसमोर प्रथम फलंदाजी करताना भारताने ३९८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताने दिलेल्या या लक्ष्यात विराट कोहलीच्या ११७ धावा आणि श्रेयस अय्यरच्या १०५ धावांनी महत्त्वाची भूमिका बजावली. श्रेयस अय्यरने आपले शतक पूर्ण करताच रोहित शर्माने भन्नाट सेलिब्रेशन केले आणि त्याची नक्कल करण्यास सुरुवात केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ४ बाद ३९७ धावा करून किवी संघासमोर ३९८ धावांचे तगडे लक्ष्य ठेवले. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने १० षटकांत १०० धावांत ३ गडी बाद केले.

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज. 

आजच्या सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ -
केन विल्यमसन (कर्णधार), डेव्हिन कॉन्वे, रचिन रवींद्र, डेरिल मिचेल, मार्क चॅपमॅन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम, मिचेल सॅंटनर, टिम साउदी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेन्ट बोल्ट. 

Web Title:    IND vs NZ Shreyas Iyer's century and indian captain Rohit sharma's  funny celebration going viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.