Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs NZ : टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर 'द्रविड-सचिन-कॉम्बो पॅक'चं 'जम्बो' चॅलेंज; इथं पाहा रेकॉर्ड

जाणून घेऊयात ज्याच्या नावात द्रविड-सचिनच्या नावाचा कॉम्बो आहे अन् जो जम्बो खेळीनं आयसीसी स्पर्धेत धुमाकूळ घालताना दिसते त्या खेळाडूच्या खास रेकॉर्डबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 11:29 IST

Open in App

IND vs NZ, Rachin Ravindra, ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात भारत-न्यूझीलंड यांच्यात सामना रंगणार आहे. दुबई येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात सेमी फायनलआधी दोन्ही संघ आपल्या ताफ्यातील ताकद दाखवून देताना दिसेल. दोन्ही संघातील फिरकीपटूंमध्ये एक वेगळी रंगत या लढतीत अनुभवायला मिळू शकते. भारतीय बॅटर न्यूझीलंड फिरकीचा सामना कसा करणार? याशिवाय न्यूझीलंडच्या तगड्या बॅटिंग लाइनअपसमोर भारतीय गोलंदाजांचे तेवर कसे दिसणार तेही पाहण्याजोगे असेत. त्यातही भारतीय संघासाठी एक फलंदाज अधिक घातक ठरू शकतो. जाणून घेऊयात ज्याच्या नावात द्रविड-सचिनच्या नावाचा कॉम्बो आहे अन् जो जम्बो खेळीनं आयसीसी स्पर्धेत धुमाकूळ घालताना दिसते त्या खेळाडूच्या खास रेकॉर्डबद्दल

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! रचिन रविंद्र 'नाम तो सुना होगा'

न्यूझीलंडच्या ताफ्यातील तो फलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे रचिन रविंद्र. भारतीय वंशाच्या या खेळाडूचं नावात राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर या भारतीय दिग्गजांच्या नावातील अद्याक्षरांचा संगम दिसून येतो. फक्त नावातच जादू नाही तर त्याप्रमाणे दमदार खेळी करण्याची ताकदही त्याने दाखवून दिलीये. २५ वर्षांच्या या खेळाडूनं पदार्पणापासून आतापर्यंत दमदार खेळीनं लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. आयसीसी सारख्या मोठ्या स्पर्धेतही त्याचा बोलबाला दिसून येतो. या स्पर्धेतील विक्रमांच्या बाबतीत त्याने मास्टर ब्लास्टरलाही मागे टाकलंय. या फलंदाजाने न्यूझीलंडकडून आतापर्यंत खेळलेल्या ३० वनडे सामन्यात ४ शतके आणि ४ अर्धशतकांच्या जोरावर ४३.२८ च्या सरासरीनं १०८२ धावा ठोकल्या आहेत. खास गोष्ट ही की, जी चार शतके त्याच्या नावे आहेत ती आयसीसी स्पर्धेतच आली आहेत. 

न्यूझीलंडच्या संघाची मोठी ताकद  ठरतोय हा फलंदाज

भारतीय वंशाच्या या खेळाडूनं मार्च २०२३ मध्ये न्यूझीलंड संघाकडून पदार्पण केले. पहिली वर्ल्ड कप स्पर्धा खेळताना त्याने तीन शतके ठोकली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यातही त्याने शतकी डाव साधला. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात त्याने सेंच्युरी केली होती. संघाला सेमी फायनलचं तिकीट मिळवून देण्यात त्याचा वाटा मोलाचा राहिला.

पठ्ठ्यानं सचिनचा हा रेकॉर्ड मोडलाय

रचिन रविंद्र याने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि बांगलादेश विरुद्ध शतक ठोकले आहे. आता तो भारतीय संघाविरुद्ध शतकी खेळीसह आपल्या भात्यातील मॅजिक दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल. वयाच्या २५ व्या वर्षी आयसीसी स्पर्धेत सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड त्याच्या नावे आहे. ४ शतकासह त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला आहे. त्यामुळे हा खेळाडू भारतीय गोलंदाजांसाठी आव्हान निर्माण करू शकतो. भारतीय संघासमोर या गड्याला रोखण्याचे मोठे आव्हानच असेल.

वयाच्या २५ व्या वर्षी आयसीसी स्पर्धेत सर्वाधिक सेंच्युरी करणारे फलंदाज

  • ४ – रचिन रविंद्र (न्यूझीलंड) (१४ डावात)
  • ३ – सचिन तेंडुलकर (भारत) (१६ डावात)
  • २ – उपुल थरंगा (श्रीलंका) (२२ डावात)
टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघन्यूझीलंड