आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात वरुण चक्रवर्तीला पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात त्याने चेंडू हाती येताच जादूही दाखवली. २५० धावांचा बचाव करताना न्यूझीलंडच्या डावातील १० व्या षटकात रोहितनं त्याला त्याला गोलंदाजीसाठी बोलावले. पहिल्या षटकात त्याने ७ धावा खर्च केल्या. पण वैयक्तिक दुसऱ्याच षटकात त्याने सलामीवीर विल यंगला चकवा दिला. मिस्ट्री स्पिनरनं आपल्या गोलंदाजीतील जादू दाखवत त्याला बोल्ड करत संघाला दुसरे यश मिळवून दिले.
वरुण चक्रवर्तीनं दाखवल आपल्या गोलंदाजीतील 'मॅजिक'
वरुण चक्रवर्ती घेऊन आलेल्या १२ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विल यंग याने कट शॉट ट्राय केला. चेंडू बॅटची कड घेऊन स्टंपवर आदळला अन् यंगची खेळी २२ धावांवरच थांबली. पन्नाशीच्या आत न्यूझीलंडच्या संघानं दुसरी विकेट गमावली. वरुण चक्रवर्तीनं टी-२० क्रिकेटमध्ये आपली खास छाप सोडली आहे. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्याच सामन्यातील दुसऱ्या षटकात त्याने आपल्या फिरकीतील जादू दाखवून दिलीये.