Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs NZ: जसप्रीत बुमराहच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट सामना ! चार षटकात उडाली धूळधाण

Jasprit Bumrah Worst Bowling figures in T20, IND vs NZ 5th T20: भारताने सामना जिंकला, पण बुमराहने खूपच निराश केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 08:28 IST

Open in App

Jasprit Bumrah Worst Bowling figures in T20, IND vs NZ 5th T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील शेवटचा सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. तिथे भारताने ४६ धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिका ४-१ अशी जिंकली. पण या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची कामगिरी खूपच खराब होती. त्याने अनेक 'नकोसे' विक्रम आपल्या नावे केले. या सामन्यात जसप्रीत बुमराहला एकही बळी मिळवता आली नाही, तसेच त्याने सर्वात महागडी गोलंदाजीही केली.

कारकिर्दीतील सर्वात वाईट 'स्पेल'

सामन्यात बुमराहने चार षटके टाकली. ५८ धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. त्याच्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा त्याचा आतापर्यंतचा सर्वात महागडा आकडा आहे. त्याची याआधीची सर्वात वाईट कामगिरी म्हणजे २०२२ मध्ये हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विकेट न घेता ५० धावा देणे. तसेच, एकेकाळी एकही षटकार न खाणाऱ्या बुमराहने या मालिकेत सर्वाधिक सहा षटकार खाल्ले. हादेखील नवा 'नकोसा' विक्रम ठरला. यापूर्वी, त्याने २०२५च्या आशिया कपमध्ये पाच षटकार खाल्ले होते.

कारकिर्दीतील सर्वात महागडे षटकही टाकले

सामन्यात बुमराहने त्याच्या कारकिर्दीतील सर्वात महागडे षटकही टाकले. त्याने डावाच्या १४ व्या षटकात २२ धावा दिल्या. हे षटक न्यूझीलंडचे फलंदाज डॅरिल मिशेल आणि बेव्हॉन जेकब्स यांनी चांगले खेळले. त्यांनी ४, ६, ६, १, ४, १ अशा ६ चेंडूवर धावा लुटल्या. बुमराहने एकाच टी२० आंतरराष्ट्रीय षटकात दिलेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या. त्याचे याआधीचे सर्वात महागडे षटक २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्ध २० धावांचे होते. त्याच मालिकेत त्याने दुसऱ्या षटकात १९ धावा दिल्या होत्या.

२०२६ च्या टी२० विश्वचषकापूर्वी भारताचा स्टार गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहची अशी कामगिरी टीम इंडियासाठी मोठी चिंता निर्माण करणारी आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bumrah's worst T20I: Expensive spell mars India's series win.

Web Summary : Jasprit Bumrah had a forgettable outing in the final T20I against New Zealand, conceding 58 runs in four overs without taking a wicket. This was his most expensive T20I spell, including a costly 22-run over. This performance raises concerns before the T20 World Cup.
टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौराजसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघटी-20 क्रिकेटभारत विरुद्ध न्यूझीलंड