IND vs NZ: फेल ठरल्यानंतरही शिखर धवनने केले रिषभचे समर्थन; म्हणाला, पंत मॅच विनर आहे...

भारतीय संघाला न्यूझीलंडच्या धरतीवर वनडे मालिका ०-१ ने गमवावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 07:30 PM2022-11-30T19:30:16+5:302022-11-30T19:31:08+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ Indian captain Shikhar Dhawan backs Rishabh Pant and advises Sanju Samson to wait a bit | IND vs NZ: फेल ठरल्यानंतरही शिखर धवनने केले रिषभचे समर्थन; म्हणाला, पंत मॅच विनर आहे...

IND vs NZ: फेल ठरल्यानंतरही शिखर धवनने केले रिषभचे समर्थन; म्हणाला, पंत मॅच विनर आहे...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय संघाला न्यूझीलंडच्या धरतीवर वनडे मालिका ०-१ ने गमवावी लागली. भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवनने ऋषभ पंतला मॅच विनर संबोधल्याने क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. जेव्हा तो कठीण वेळेतून जात असतो तेव्हा त्याला पाठिंबा देणे संघाचे काम असल्याचे धवनने म्हटले. तर संजू सॅमसनने मर्यादित षटकांच्या संघामध्ये जागा मिळण्यासाठी थोडी वाट पाहावी असा सल्ला देखील धवनने दिला. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा पंत न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेत फेल ठरला. त्याने किवी संघाविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात १६ चेंडूत १० धावा केल्या.

भारतीय कर्णधार शिखर धवनने सामना झाल्यानंतर म्हटले, "एकूणच आपल्याला पाहावे लागेल की आपल्या संघाचा मॅच विनर कोण असेल. तुम्ही विश्लेषण करत असता आणि तुमचे निर्णय त्याच्यावरच आधारित असतात." पंतने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधील मागील ९ डावांमध्ये निराशाजनक खेळी केली आहे. तर सॅमसनने यादरम्यान दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या घरच्या मालिकेनंतर न्यूझीलंड दौऱ्यातील दुसऱ्या सामन्यात ३६ धावांचे योगदान दिले. 

शिखर धवनने केले रिषभचे समर्थन
सॅमसनच्या तुलनेत पंतला संघात सामील करण्याच्या अशा पेचाच्या परिस्थितीत कर्णधाराच्या जागी असणे कठीण आहे. "नक्कीच संजू सॅमसनला देखील जी संधी मिळाली आहे, तो चांगले करत आहे. मात्र कधी-कधी आपल्याला आपल्या संधीची वाट पाहावी लागते. कारण की दुसऱ्या खेळाडूने चांगले केले आहे आणि आम्ही त्याला अर्थात पंतला मॅच विनर म्हणून पाहतो. त्यामुळे जेव्हा तो चांगले करत नसेल तेव्हा आपल्याला त्याचे समर्थन करण्याची गरज आहे." असे भारतीय कर्णधार शिखर धवनने आणखी म्हटले. 

न्यूझीलंडने १-० ने मालिकेवर केला कब्जा 
दरम्यान, आज न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील वनडे मालिकेचा अखेरचा सामना खेळवला जात होता. मात्र पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करून यजमानांना २२० धावांचे आव्हान दिले होते. भारताने दिलेल्या २२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किवी संघाने शानदार सुरूवात केली. न्यूझीलंडकडून सलामीवीर फिन ॲलनने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. तर डेव्होन कॉन्वे ५१ चेंडूत ३८ धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडच्या डावाचे १८वे षटक पूर्ण होताच पावसाचे आगमन झाले आणि खेळ थांबला. अखेर यजमान किवी संघाने १-० ने मालिकेवक कब्जा केला. 
 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: IND vs NZ Indian captain Shikhar Dhawan backs Rishabh Pant and advises Sanju Samson to wait a bit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.