India Wins T20 World Cup 2026 Final: India Clinch T20 World Cup Glory, Create History : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या धुरंधरांनी इतिहास रचला आहे. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगलेल्या फानयलमध्ये न्यूझीलंडला ९६ धावांनी पराभूत करत गत चॅम्पियन भारतीय संघाने विक्रमी तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावण्याचं स्वप्न साकार केले. टी-२० वर्ल्ड कपच्या आतापर्यंतच्या इतिहासात कोणत्याही संघाला सलग दोन वेळा ही स्पर्धा जिंकता आली नव्हती. एवढेच नाही तर यजमानपद भुषवताना ट्रॉफी जिंकणारी टीम इंडिया पहिली टीम ठरली आहे. MS धोनी आणि रोहित शर्मानंतर सूर्यकुमार यादव हा भारतीय संघाला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत चॅम्पियन करणारा तिसरा कर्णधार ठरला.
भारत बनला चैंपियन | IND v NZ T20 WC Final Match Highlights
टी-२० वर्ल्ड कपच्या यंदाच्या हंगामात सुरुवातीपासून टीम इंडिया जेतेपदाची प्रबळ दावेदार होती. सुपर ८ फेरीतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एका पराभवामुळे टीम इंडिया 'जर तर'च्या समीकरणात फसते की, काय? अशी परिस्थितीही निर्माण झाली होती. पण ज्या मैदानाती पराभवामुळे टीम इंडियासंदर्भात उलट सुलट चर्चा रंगल्या त्याच मैदानात टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत करत ऐतिहासिक जेतेपद पटकावले.
फायनलमध्ये न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार मिचेल सँटनर याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी त्याचा हा निर्णय फोल ठरवला. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यानंतर ईशान किशनचा जलवा पाहायला मिळाला. अखेरच्या षटकात शिवम दुबेच्या पॉवर हिटिंगच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात २५५ धावा करत न्यूझीलंडसमोर २५६ धावांचे टार्गेट सेट केले होते. भारतीय संघाने दिलेल्या डोंगराऐवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना टीम सिफर्टच्या २६ चेंडूतील ५२ धावांच्या खेळीशिवाय मिेल सँटनरंनं ३५ चेंडूत केलेल्या ४३ धावांची खेळी वगळता एकाही बॅटरला भारतीय गोलंदाजांसमोर तग धरता आला नाही. परिणामी न्यूझीलंडचा संघ १९ व्या षटकात १५९ धावांवर आटोपला. भारतीय संघाने ९६ धावांनी विजय नोंदवत विक्रमी विजेतेपद पटकावले. भारतीय संघाकडून गोलंदाजीत जसप्रीत बूमराहनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलनं ३ तर हार्दिक पांड्या वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्मानं एक विकेट आपल्या खात्यात जमा केली.
Web Summary : India clinched the T20 World Cup, defeating New Zealand by 96 runs. Suryakumar Yadav led India to their record-breaking third title. Jasprit Bumrah's four-wicket haul sealed the victory in Ahmedabad.
Web Summary : भारत ने न्यूजीलैंड को 96 रनों से हराकर टी20 विश्व कप जीता। सूर्यकुमार यादव के नेतृत्व में भारत ने रिकॉर्ड तीसरी बार खिताब जीता। जसप्रीत बुमराह ने अहमदाबाद में चार विकेट लेकर जीत सुनिश्चित की।