IND vs NZ T20I Axar Patel Injury Scare For Team India : नागपूरच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय नोंदवला. पण सामन्यात १-० आघाडी घेऊनही टीम इंडियाच्या ताफ्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण न्यूझीलंडच्या डावातील १६ व्या षटकात गोलंदाजी वेळी टी-२० संघाचा उप कर्णधार आणि ऑलराउंडर अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाल्याचे पाहायला मिळाले. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर असताना याआधीच तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदरच्या रुपात टीम इंडियाला धक्क्यावर धक्के बसले आहेत. त्यात आता आणखी एका दुखापतीची भर पडली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...अन् अक्षर पटेलवर आली मैदान सोडण्याची वेळ, नेमकं काय घडलं?
भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना ग्लेन फिलिप्सनं धमाकेदार खेळी केली. तो न्यूझीलंडच्या संघाला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून देण्याच्या मूडमध्ये खेळत होता. पण अक्षर पटेलनं त्याला आपल्या जाळ्यात अडकवले अन् टीम इंडियाला मोठा दिलासा दिला. पण त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या डॅरिल मिचेल याने टीम इंडियाला मोठा धक्का दिला. १६ व्या अक्षर पटेल गोलंदाजी करत होता. पहिल्या दोन चेंडूवर त्याने फक्त ३ धावा खर्च केल्या. तिसऱ्या चेंडूवर डॅरिल मिचेलनं याने गोलंदाजाच्या दिशनं जोरदार फटका मारला. हा चेंडू अडवताना अक्षर पटेलच्या बोटाला दुखापत झाली. परिणामी त्याच्यावर मैदान सोडण्याची वेळ आली.
Abhishek Sharma New Record : षटकारांची आतषबाजी! अभिषेक शर्मानं मोडला गुरु युवराज सिंगचा रेकॉर्ड
अभिषेक शर्माची 'बेबी ओव्हर' अन् टीम इंडियाच्या ताफ्यात टेन्शनची गोष्ट
अक्षर पटेलला चेंडू लागल्यावर फिजिओ मैदानात आले. त्याच्या बोटातून रक्तस्त्राव होतानाही कॅमेऱ्यात दिसून आले. असह्य झालेल्या वेदनेसह त्याने मैदान सोडले. उर्वरित षटकातील तीन चेंडू फेकण्यासाठी सूर्यकुमार यादवनं अभिषेक शर्माच्या हाती चेंडू सोपवला. अभिषेकनं टाकलेली 'बेबी ओव्हर' (तीन चेंडूचे षटक) टीम इंडियासाठी धोक्याची घंटाच आहे. अक्षर पटेल हा टीम इंडियातील एक प्रमुख खेळाडू आहे. बॅटिंग बॉलिंगच्या जोरावर सामना फिरवण्याची क्षमता असणाऱ्या खेळाडूला झालेली दुखापत जर गंभीर असेल तर आगामी टी-२० स्पर्धेच्या तयारीत असलेल्या टीम इंडियाला तो एक मोठा धक्काच ठरेल.
Web Summary : Axar Patel's injury during the India vs. New Zealand T20 match raises concerns for Team India. Patel hurt his finger while fielding, forcing him to leave the field. Abhishek Sharma completed the over. The injury adds to existing worries ahead of the T20 World Cup.
Web Summary : भारत बनाम न्यूजीलैंड टी20 मैच के दौरान अक्षर पटेल की चोट ने टीम इंडिया की चिंता बढ़ा दी है। फील्डिंग करते समय पटेल की उंगली में चोट लग गई, जिसके कारण उन्हें मैदान छोड़ना पड़ा। अभिषेक शर्मा ने ओवर पूरा किया। चोट ने टी20 विश्व कप से पहले मौजूदा चिंताओं को बढ़ा दिया है।