शिवम दुबेचं वादळी अर्धशतक; पण नॉन स्ट्राइकवर तो दुर्देवीरित्या Run Out झाला अन् मॅच फिरली (VIDEO)

त्याने भारताकडून टी-२० क्रिकेटमधील तिसरे जलद अर्धशतक झळकावले. ही खेळी आणखी बहरदार करत त्याने टी-२० कारकिर्दीतील सर्वोच्च खेळीही साकारली. पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 22:42 IST2026-01-28T22:40:49+5:302026-01-28T22:42:21+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs NZ 4th T20I Shivam Dube Hits Third Fastest 50 For India But Got Run Out Very Unfortunately Watch Video | शिवम दुबेचं वादळी अर्धशतक; पण नॉन स्ट्राइकवर तो दुर्देवीरित्या Run Out झाला अन् मॅच फिरली (VIDEO)

शिवम दुबेचं वादळी अर्धशतक; पण नॉन स्ट्राइकवर तो दुर्देवीरित्या Run Out झाला अन् मॅच फिरली (VIDEO)

न्यूझीलंडविरुद्धच्या विशाखापट्टणमच्या मैदानातील सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारतीय संघातील आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. संघ अडचणीत असताना तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करत शिवम दुबेनं टीम इंडियाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने भारताकडून टी-२० क्रिकेटमधील तिसरे जलद अर्धशतक झळकावले. ही खेळी आणखी बहरदार करत त्याने टी-२० कारकिर्दीतील सर्वोच्च खेळीही साकारली. पण हर्षित राणानं सरळ रेषेत मारलेल्या फटक्यामुळे शिवम दुबे दुर्देवीरित्या धावबाद झाला. त्याची विकेट गेली अन् मॅच न्यूझीलंडच्या बाजूनं फिरली. 

सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला अन् पहिल्या चेंडूवर षटकार मारला
 

न्यूझीलंडच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियासमोर २१६ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना अभिषेक शर्माच्या रुपात भारतीय संघाने पहिल्याच चेंडूवर पहिली विकेट गमावली. त्याची जागा घेण्यासाठी कर्णधार सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तोही स्वस्तात बाद झाला. संजू सॅमसन पाठोपाठ हार्दिक पांड्याच्या रुपात टीम इंडियाने ६३ धावांवर चौथी विकेट गमावली. संघ बिकट अवस्थेत असताना शिवम दुबे सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. सँटनरच्या पहिल्याच चेंडूवर षटकारासह खाते उघडत त्याने आपले इरादे स्पष्ट केले. १५ चेंडूवर षटकार मारत या पठ्ठ्यानं अर्धशतकही पूर्ण केले. हा धडाका त्याने कायम ठेवत संघाला विजयाच्या दिशेने नेले. जोपर्यंत शिवम दुबे आहे तोपर्यंत टीम इंडियासाठी मॅच ऑन होती. पण १५ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर तो दुर्देवीरित्या धावबाद झाला.

तो रनआउट झाला अन् मॅचच फिरली

हार्दिक पांड्याच्या रुपात ९ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर टीम इंडियाला चौथा धक्का बसला. सँटनरच्या पहिल्याच चेंडूवर षटकारासह खाते उघडणाऱ्या दुबेनं १५ व्या चेंडूवर षटकार मारत अर्धशतकही पूर्ण केले. हा धडाका त्याने कायम ठेवत संघाला विजयाच्या दिशेने नेले. जोपर्यंत शिवम दुबे आहे तोपर्यंत टीम इंडियासाठी मॅच ऑन होती. पण १५ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर तो दुर्देवीरित्या धावबाद झाला.

नेमकं काय घडलं?

अखेरच्या ३१ चेंडूत भारतीय संघाला विजयासाठी ७१ धावांची आवश्यकता होती. शिवम दुबे हा आक्रमक अंदाजात खेळत असल्यामुळे पुढच्या दोन तीन षटकात तो मॅच टीम इंडियाच्या बाजूनं झुकवेल, असेच वाटत होते. पण १५ व्या षटकातील मॅट हेन्रीच्या अखेरच्या चेंडूवर स्ट्राइकवर असलेल्या हर्षित राणाने थेट गोलंदाजाच्या दिशेने जोरदार फटका मारला. हा चेंडू मॅट हेन्रीच्या हाताला स्पर्श करून थेट नॉन स्ट्राइक एन्डच्या स्टंपवर आदळला. शिवम दुबे क्रीज बाहेर असल्यामुळे त्याला धावबाद होऊन तंबूत परतण्याची वेळ आली. या विकेटसह सामनाही न्यूझीलंडच्या बाजूनं फिरला.

Web Title : शिवम दुबे का अर्धशतक बेकार; दुर्भाग्यपूर्ण रन-आउट ने मैच पलटा।

Web Summary : शिवम दुबे के विस्फोटक अर्धशतक ने न्यूजीलैंड के खिलाफ रनों का पीछा करते हुए भारत की उम्मीदें जगाईं। उनकी शानदार पारी के बावजूद, दुर्भाग्यपूर्ण रन-आउट ने मैच का रुख बदल दिया, जिससे भारत की हार हुई।

Web Title : Shivam Dube's fifty in vain; unlucky run-out turns match.

Web Summary : Shivam Dube's explosive half-century raised India's hopes in the chase against New Zealand. Despite his brilliant innings and fastest T20 fifty, a unfortunate run-out shifted the momentum, leading to India's defeat.