IND vs NZ 1st T20I : शतकी सामन्यात 'सुफला शॉट' बसला अन् सूर्याचं 'ग्रहण' सुटलं, पण...

सूर्या दादाची अभिषेक शर्मासोबत शतकी भागीदारीची संधी अवघ्या एका धावेनं  हुकली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 20:33 IST2026-01-21T20:32:24+5:302026-01-21T20:33:09+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs NZ 1st T20I Suryakumar Yadav becomes 4th Indian to play 100 T20I matches Handy Knock Of 32 Runs Just 22 Balls Mitchell Santner Breaks 99 Run Partnership With Abhishek Sharma | IND vs NZ 1st T20I : शतकी सामन्यात 'सुफला शॉट' बसला अन् सूर्याचं 'ग्रहण' सुटलं, पण...

IND vs NZ 1st T20I : शतकी सामन्यात 'सुफला शॉट' बसला अन् सूर्याचं 'ग्रहण' सुटलं, पण...

Suryakumar Yadav becomes 4th Indian to play 100 T20I matches : न्यूझीलंडविरुद्धच्या नागपूर येथील विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचे ग्रहण सुटल्याचे पाहायला मिळाले. सलामीवीर संजू सॅमसनसह ३ वर्षांनी टीम इंडियात कमबॅक करणारा इशान किशन स्वस्तात आटोपल्यावर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यानं खणखणीत चौकार मारून खाते उघडले. या सामन्यात त्याच्या भात्यातून 'सुपला शॉट'ही पाहायला मिळाला. शतकी सामन्यात तो अर्धशतकी खेळीसह नव्या वर्षाची दमदार सुरुवात करेल, असे वाटत होते. पण न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने ३२ धावांवर त्याच्या खेळीला ब्रेक लावला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

सूर्या दादाची अभिषेक शर्मासोबत शतकी भागीदारीची संधी अवघ्या एका धावेनं  हुकली 

पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने २७ धावांवर दोन विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा जोडी जमली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४७ चेंडूत ९९ धावांची भागीदारी रचली. ही जोडी शतकी भागीदारीसह संघाच्या धावसंख्येत आणखी भर घालेल, असे वाटत असताना ११ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर मिचेल सँटनरनं सूर्याच्या रुपात भारतीय संघाला तिसरा धक्का दिला. सूर्यकुमार यादवनं २२ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने या सामन्यात ३२ धावांची खेळी केली. 

Abhishek Sharma New Record : षटकारांची आतषबाजी! अभिषेक शर्मानं मोडला गुरु युवराज सिंगचा रेकॉर्ड

सूर्याचा खास शतक, विराट रोहित आणि हार्दिकनंतर अशी कामगिरी करणारा ठरला चौथा भारतीय

सुर्यकुमार यादव आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १०० सामने खेळणारा चौथा भारतीय ठरला आहे. याआधी  रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी शंभरपेक्षा अधिक सामने खेळल्याचा रेकॉर्ड आहे. ९९ सामन्यांत सूर्यकुमार यादवने ३५ च्या सरासरीसह २,७८८  धावा केल्या होत्या. यात चार शतकांचा समावेश आहे. छोट्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक ४ शतके झळकावणारा रोहित शर्मासह तो संयुक्तरित्या अव्वलस्थानी आहे. शतकी सामन्यात त्याचा अर्धशतकी डाव हुकला. पण त्याची ही खेळी नव्या वर्षांत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी टीम इंडियासह त्याला स्वत:ला मोठा दिलासा देणारी आहे.

Web Title : सूर्यकुमार यादव का शतकीय मैच: अच्छी शुरुआत, पर जल्द अंत

Web Summary : अपने 100वें टी20आई में, सूर्यकुमार यादव ने अच्छी शुरुआत की लेकिन 32 रन पर आउट हो गए। भारत के शुरुआती विकेट खोने के बाद अभिषेक शर्मा के साथ उनकी साझेदारी आशाजनक दिखी। वह 100 टी20आई खेलने वाले चौथे भारतीय बने।

Web Title : Suryakumar Yadav's Century Match: A Promising Start Cut Short

Web Summary : In his 100th T20I, Suryakumar Yadav started strong but was dismissed for 32. His partnership with Abhishek Sharma showed promise after India lost early wickets. He became the fourth Indian to play 100 T20Is.