IND vs NZ 1st T20 Live Streaming : आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची द्विपक्षीय मालिका खेळवण्यात येणार आहे. पाहुण्या न्यूझीलंड संघ वनडे मालिकेतील विजयामुळे आत्मविश्वासाने या मालिकेत मैदानात उतरेल. दुसरीकडे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गतवर्षीप्रमाणे यंदाही टी-२० तील आपला दबदबा कायम असल्याचे दाखवून देण्यासाठी प्रयत्नशील असेल. इथं एक नजर टाकुयात कुठं अन् कधी पाहता येईल दोन्ही संघातील पहिला टी-२० सामना यासंदर्भातील सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना कधी आणि कुठं रंगणार?
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघातील टी-२० मालिकेतील पहिला सामना नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात रंगणार आहे. बुधवारी, २१ नोव्हेंबरला ७ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी अर्धातास अगोदार दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील.
ICC ODI Rankings : विराट कोहलीला धक्का, नंबर-1 चा ताज काही दिवसांतच गमावला; डॅरिल मिचेल पुन्हा बनला वनडेचा ... IND vs NZ 1st T20I सामन्याचे लाईव्ह प्रसारण आणि स्ट्रीमिंग
भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामन्याचे थेट प्रेक्षपण स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येईल. याशिवाय मोबाईलवर JioHotstar अॅप आणि वेबसाईटच्या माध्यमातूनही क्रिकेट चाहत्यांना हा सामना पाहता येईल.
डॅरिल मिचेलसह इशानच्या कामगिरीवर असतील नजरा
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत धमाका करणारा डॅरिल मिचेल टी-२० मालिकेतही भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो. त्याला लवकर तंबूत धाडण्याचे चॅलेंज भारतीय गोलंदाजांसमोर असेल. दुसऱ्या बाजूला भारतीय ताफ्यातून इशान किशनवर सर्वांच्या नजरा असतील. बऱ्याच वर्षांनी टीम इंडियात स्थान मिळाल्यावर त्याचे प्लेइंग इलेव्हनमधील स्थानही जवळपास निश्चित आहे. सामन्याआधीच भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने तिलक वर्माच्या जागी तो तिसऱ्या क्रमांकावर खेळणार हे स्पष्ट केले आहे.
टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, इशान किशन (यष्टीरक्षक), रवि बिश्नोई
न्यूझीलंडचा टी२० मालिकेसाठीचा संघ
मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, जॅक फुल्क्स, मॅट हेन्री, काईल जेमीसन, बेव्हन जेकब्स, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम रॉबिन्सन, ईश सोढी, ख्रिश्चन क्लर्क.
Web Summary : India faces New Zealand in a T20 series before the World Cup. Watch live on Star Sports and JioHotstar. Eyes are on Daryl Mitchell and Ishan Kishan. India's squad is led by Suryakumar Yadav.
Web Summary : भारत टी20 विश्व कप से पहले न्यूजीलैंड से टी20 श्रृंखला खेलेगा। स्टार स्पोर्ट्स और जियो हॉटस्टार पर लाइव देखें। सभी की निगाहें डेरिल मिशेल और इशान किशन पर होंगी। भारत की टीम का नेतृत्व सूर्यकुमार यादव करेंगे।