Rohit Sharma And Virat Kohli Honored Creative Ceremony At New BCA Stadium in Vadodara : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यादरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन भारतीय दिग्गजांचा वडोदऱ्यातील नव्या कोटंबी स्टेडियममध्ये खास सन्मान करण्यात आला. पहिला डाव संपल्यानंतर हे दोन्ही दिग्गज खेळाडू एका खास कपाटातून बाहेर येताना दिसले. त्यानंतर त्यांचा विशेष पद्धतीने गौरव करण्यात आला. या खास क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नव्या वर्षातील नवा सामना अन् विराट-रोहितचा जलवा!
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसह भारतीय संघाने नव्या वर्षाची सुरुवात केली. रोहित आणि विराट फक्त वनडेत खेळत असल्यामुळे वडोदराच्या मैदानात दोघांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. वडोद्याच्या मैदानातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात दोघांचा अगदी अनोख्या अंदाजात सन्मान करण्यात आला. रोहित आणि विराट एका कपाटातून बाहेर आले. या कपाटावर दोघांचे पोस्टर लावलेले होते. कपाटातून बाहेर आल्यावर दोघांनी त्यावर स्वाक्षरी केली. त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन दोघांंचा गौरव करण्यात आला.
IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी