IND vs NZ 1st ODI India Have Won The Toss : भारत-न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला वनडे सामना वडोदराच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षात भारतीय संघ सातत्याने नाणेफेक गमावल्यामुळे चर्चेत राहिला. पण नव्या वर्षात शुभमन गिलनं डावखुऱ्या हाताने नाणे उंचावत नाणेफेकी वेळी 'उजवा' ठरल्याचे पाहायला मिळाले. टॉसनंतर भारतीय कर्णधाराने पहिल्यांदा गोलंदाजी करताना सहा गोलंदाजांसह मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
न्यूझीलंडच्या संघाने या खेळाडूला दिली पदार्पणाची संधी
न्यूझीलंडचा संघ मायकेल ब्रेसवेल (Michael Bracewell) च्या नेतृत्वाखालील वनडे मालिकेसाठी मैदानात उतरला आहे. नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडच्या संघाने क्रिस्टियन क्लार्कला पदार्पणाची संधी दिली आहे. २४ वर्षीय मध्यम जलदगती गोलंदाज असलेलाया क्लार्क तळाच्या फळीत फलंदाजीसाठीही उपयुक्त ठरू शकतो.
भारत (प्लेइंग इलेव्हन)
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन)
डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅकरी फुल्क्स, क्रिस्टियन क्लार्क, काइल जेमिसन, आदित्य अशोक
Web Summary : In the first ODI, India won the toss and chose to bowl. Shubman Gill's lucky toss signals a promising start to the year for Team India. Six bowlers will feature in the lineup.
Web Summary : पहले वनडे में भारत ने टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला किया। शुभमन गिल का भाग्यशाली टॉस टीम इंडिया के लिए साल की अच्छी शुरुआत का संकेत देता है। छह गेंदबाज टीम में शामिल होंगे।