Join us
Daily Top 2Weekly Top 5

कैसा फसाया... अभिषेक शर्माचा 'ड्युप्लिकेट' बोलवून नेदरलँड्सचा सराव अन् शून्यावर केला 'गेम'

Abhishek Sharma Duplicate, IND vs NED T20 World Cup 2026: नेदरलँड्सच्या आर्यन दत्तने अभिषेकला शून्यावर क्लीन बोल्ड केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 12:22 IST

Open in App

Abhishek Sharma Duplicate, IND vs NED T20 World Cup 2026: भारतीय संघाने आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव केला. शिवम दुबेचे अर्धशतक (६६) आणि सूर्यकुमार यादव (३४) व तिलक वर्माच्या (३१) दमदार खेळी याच्या बळावर भारताने १९३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात नेदरलँड्सच्या संघाने चांगली झुंज देत ७ गड्यांच्या बदल्यात १७६ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे भारताचा विजय झाला. पण भारताचा स्फोटक सलामीवीर सलग तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. या सामन्यानंतर अभिषेक शर्माच्या ड्युप्लिकेटबद्दल एक रंजक किस्सा समोर आला.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

दोन किमी दुरून मागवला 'ड्युप्लिकेट'

नेदरलँड्स क्रिकेट संघाकडे एकही डावखुरा फलंदाज नव्हता. त्यामुळे त्यांनी गुजरात क्रिकेट असोसिएशनला विनंती केली की, आम्हाला नेट प्रॅक्टिससाठी एक डावखुरा फलंदाज हवा आहे. गुजरात क्रिकेटने दोन किमी दूर प्रॅक्टिस करत असलेल्या मनन हिंग्राजिया (Manan Hingrajia) या डावखुऱ्या फलंदाजाला बोलवले.

नेदरलँड्सने आखला 'मास्टरप्लॅन'

नेदरलँड्सच्या संघाने त्याला सांगितले की जसा अभिषेक शर्मा खेळतो तशीच फलंदाजी कर. सगळे चेंडू चौकार षटकार मारायला प्रयत्न कर. नेट्समध्ये त्याचाविरोधात नेदरलँड्सचा स्पिनर आर्यन दत्त याने सराव केला आणि एक रणनिती बनवली. त्यानुसार मास्टरप्लॅन आखून आर्यन दत्तने अभिषेकला गोलंदाजी केली आणि सापळ्यात अडकवून शून्यावर त्रिफळाचीत केले. या किस्सा सुप्रसिद्ध क्रिकेट जाणकार विक्रम साठ्ये यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर सांगितला.

दरम्यान, भारतीय संघाविरूद्ध नेदरलँड्सने अपेक्षेपेक्षा खुपच चांगली झुंज दिली. विजेतेपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १९३ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात नेदरलँड्सनेही १७६ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे त्यांना केवळ १७ धावांनी हार पत्करावी लागली. साखळी फेरीत नेदरलँड्सच्या संघाला तीनपैकी एकचा सामना जिंकता आला. पण भारत आणि पाकिस्तान या दोन्ही तुल्यबळ संघांविरूद्ध त्यांना चांगली झुंज दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Netherlands' clever plan: Using Abhishek Sharma's duplicate to dismiss him.

Web Summary : Netherlands used a duplicate of Abhishek Sharma for net practice. They studied his batting style, devised a plan with Aryan Dutt, and dismissed Sharma for a duck during the match, showcasing their strategic approach.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६अभिषेक शर्माभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ