IND vs NED : शिवम दुबेचा 'बाहुबली' शो! उत्तुंग षटकारांची आतषबाजी करत टीम इंडियासाठी ठरला संकटमोचक

टीम इंडिया धावांसाठी संघर्ष करत असल्याचे चित्र निर्माण झाले असताना शिवम दुबे संघासाठी संकटमोचक बनला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 20:42 IST2026-02-18T20:41:37+5:302026-02-18T20:42:38+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs NED 36th Match ICC T20 World Cup 2026 Shivam Dube Gets To His Half Century In Just 25 Deliveries Watch Video | IND vs NED : शिवम दुबेचा 'बाहुबली' शो! उत्तुंग षटकारांची आतषबाजी करत टीम इंडियासाठी ठरला संकटमोचक

IND vs NED : शिवम दुबेचा 'बाहुबली' शो! उत्तुंग षटकारांची आतषबाजी करत टीम इंडियासाठी ठरला संकटमोचक

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील नेदरलँड्स विरुद्धच्या साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत शिवम दुबेनं उत्तुंग फटकेबाजीचा खास नजराणा पेश करत 'बाहुबली' शो दाखवून दिला. ५ उत्तुंग षटकार आणि २ चौकाराच्या मदतीने त्याने अवघ्या २५ चेंडूत २०० च्या स्ट्राईक रेटनं अर्धशतक साजरे केले. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याचे हे पहिले अर्धशतक आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात आघाडीच्या फळीतील फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. टीम इंडिया धावांसाठी संघर्ष करत असल्याचे चित्र निर्माण झाले असताना शिवम दुबे संघासाठी संकटमोचक बनला. त्याने तुफान फटकेबाजीसह आपल्या ताकदीचा खास नजराणा पेश केला.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

  शिवम दुबेनं  ३१ चेंडूत २१२.९० च्या स्ट्राईक रेटसह ६६ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याची ही खेळी ६ उत्तुंग षटकार आणि ४ चौकाराने बहरली होती. या खेळीसह दुबेनं टॉप आॉर्डरमधील उणीव भरून काढण्याची हमीच दिली आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील USA विरुद्धच्या पहिल्या सामन्यात शिवम दुबेवर गोल्डन डकची नामुष्की ओढावली होती. पण मागील दोन सामन्यात त्याने संघासाठी उपयुक्त खेळी करण्याची आपली धमक दाखवून दिली. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात त्याने १६ चेंडूत २३ धावांच्या खेळीनंतर पाकिस्तान विरुद्ध त्याच्या भात्यातून १७ चेंडूत २७ धावांची उपयुक्त खेळी पाहायला मिळाली होती. आता नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात त्याने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिले अर्धशतक झळकावत उर्वरित सामन्यात आपली ताकद दाखवून देण्याचा शड्डू ठोकला आहे.
 

Web Title : शिवम दुबे का 'बाहुबली' शो: शानदार छक्कों से भारत को बचाया!

Web Summary : शिवम दुबे के शानदार अर्धशतक, जिसमें पांच ऊंचे छक्के शामिल थे, ने टी20 विश्व कप में नीदरलैंड के खिलाफ टीम इंडिया को बचाया। शीर्ष क्रम के बल्लेबाजों के विफल होने पर, दुबे की शक्तिशाली हिटिंग ने खेल को बदल दिया, जिससे उनकी उल्लेखनीय प्रतिभा और ताकत का प्रदर्शन हुआ।

Web Title : Shivam Dube's 'Baahubali' Show: Rescues India with Towering Sixes!

Web Summary : Shivam Dube's explosive half-century, featuring five towering sixes, rescued Team India in the T20 World Cup match against the Netherlands. When top-order batsmen faltered, Dube's powerful hitting turned the tide, showcasing his remarkable talent and strength.