Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 World Cup: अभिषेक शर्मा रुग्णालयात; भारताचा 'नवा भिडू' तयार! नेट्समध्ये केला कसून सराव

Abhishek Sharma Team India, IND vs NAM T20 World Cup 2026: अभिषेक शर्माची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 10:46 IST

Open in App

Abhishek Sharma Hospitalised Team India Changes, IND vs NAM T20 World Cup 2026: भारतीय संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत अमेरिकेविरुद्ध विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. या सामन्यात भारतीय फलंदाजी काही प्रमाणात अपयशी ठरल्याचे दिसले. पहिल्या चेंडूपासून तुफान वेगाने धावा करणारा प्रतिभावान फलंदाज अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला. भारतीय संघासाठी हा प्रकार अनपेक्षित होता. त्यापुढचे फलंदाजही फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद झाले. त्यामुळे भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात ही चूक सुधारण्याची अपेक्षा आहे. पण त्याआधी भारतीय चाहत्यांसाठी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. अभिषेक शर्मा दुखापतग्रस्त असून त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. अशा परिस्थितीत भारताचा प्लॅन बी तयार असल्याचे दिसत आहे.

अभिषेक शर्मा रुग्णालयात, 'प्लॅन बी' तयार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक शर्मा रविवारी गौतम गंभीरच्या घरून टीम इंडियाच्या डिनरमधून लवकर निघून गेला. पहिल्या सामन्यानंतर अभिषेक शर्मा आणि मोहम्मद सिराजने पोटदुखीची तक्रार केली होती. सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवनेही अभिषेकची तब्येत बिघडल्याची तक्रार केली होती. जसप्रीत बुमराहलाही तापामुळे पहिल्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्यातच आता भारतीय संघ अभिषेक शर्माच्या जागी एका अनुभवी सलामीवाराला संघात संधी देऊ शकेल. हा सलामीवीर म्हणजे संजू सॅमसन.

संजू सॅमसनला संधीचं सोनं करावं लागेल

जसप्रीत बुमराह तंदुरुस्त आहे असे सांगण्यात आले आहे. पण अभिषेकच्या प्रकृतीबद्दल कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही. त्यामुळे, १२ फेब्रुवारीपर्यंत तो दुसऱ्या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त होईल की नाही याबद्दल अनिश्चितता आहे. जर अभिषेक तंदुरुस्त नसेल, तर संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता आहे. संजू सॅमसनने दुसऱ्या सामन्याआधी बराच वेळ घाम गाळला आणि नेट्समध्ये इशान किशनसोबत सराव केला.

दरम्यान, भारतीय संघ २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील आपला दुसरा सामना १२ फेब्रुवारी रोजी नामिबियाविरुद्ध खेळणार आहे. दुसऱ्या सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराह संघात सामील झाला आहे हे आधीच स्पष्ट झाले आहे. जर बुमराह उपलब्ध असेल तर एका खेळाडूला वगळावे लागेल. अशा परिस्थितीत, अर्शदीप सिंग किंवा मोहम्मद सिराज यापैकी एकाचा बळी जाऊ शकतो. कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी ही मोठी डोकेदुखी ठरू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : T20 World Cup: Abhishek Sharma Hospitalized; India's 'New Hope' Ready!

Web Summary : Abhishek Sharma's illness raises concerns for India. Sanju Samson practiced extensively, potentially replacing him for the Namibia match. Bumrah is fit.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६अभिषेक शर्मासंजू सॅमसनभारतीय क्रिकेट संघ