IND vs NAM : ईशान किशनचा 'शानदार' शो! २० चेंडूत अर्धशतक साजरे करत खास विक्रमाला गवसणी

त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने पॉवर प्लेमधील सर्वोच्च धावसंख्याही उभारली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 19:44 IST2026-02-12T19:43:39+5:302026-02-12T19:44:50+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs NAM 18th Match Ishan Kishan 2nd Fastest Fifty ICC T20 World Cup 2026 | IND vs NAM : ईशान किशनचा 'शानदार' शो! २० चेंडूत अर्धशतक साजरे करत खास विक्रमाला गवसणी

IND vs NAM : ईशान किशनचा 'शानदार' शो! २० चेंडूत अर्धशतक साजरे करत खास विक्रमाला गवसणी

Ishan Kishan 2nd Fastest Fifty ICC T20 World Cup 2026  : दिल्लीच्या मैदानातील नामिबियाविरुद्धच्या सामन्यात ईशान किशनचा शानदार शो पाहायला मिळाला. पॉवर प्लेमध्ये तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करताना ईशानने २० चेंडूत अर्धशतक साजरे केले. यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील हे दुसरे जलद अर्धशतक ठरले. याआधी श्रीलंकेच्या शनाकानं ओमानविरुद्ध १९ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने पॉवर प्लेमधील मोठी धावसंख्या उभारली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

रोहित शर्माच्या खास क्लबमध्ये एन्ट्री

ईशान किशान याने पॉवर प्लेमध्ये तुफान फटकेबी करत हिटॅमन रोहित शर्माला आणि केएल राहुलच्या पंक्तीत एन्ट्री मारली आहे. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध पॉवर प्लेमध्ये २१ चेंडूत ५१ धावांची खेळी केली होती. त्यापाठोपाठ या यादीत केएल राहुलचा नंबर लागतो. २०२१ च्या हंगामात लोकेश राहुलनं स्कॉटलंडविरुद्ध १९ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. नामिबियाविरुद्ध ईशान किशन याने पॉवरप्लेमध्ये २० चेंडूत अर्धशतक साजरे केले. अर्धशतक पूर्ण केले होते. इशान किशन याने २० चेंडूत हा डाव साधला. इशान किशन याने २४ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने २५४ च्या स्ट्राईक रेटसह ६१ धावांची खेळी केली.  गेरहार्ड इरास्मुस याने त्याच्या वादळी खेळीला ब्रेक लावला.

Sanju Samson : टी-२० वर्ल्ड चॅम्पियनचा टॅग! नामिबियाविरुद्ध पहिली संधी! सिक्सरसह खाते उघडले; पण...

टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सर्वात जलद अर्धशतकी खेळी करणारे फलंदाज

  • १२ चेंडू – युवराज सिंग विरुद्ध इंग्लंड, डरबन, २००७
  • १८ चेंडू – केएल राहुल विरुद्ध स्कॉटलंड, दुबई, २०२१
  • १९ चेंडू – रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ग्रोस आयलेट, २०२४
  • २० चेंडू – युवराज सिंग विरुद्ध ऑस्ट्रेलिया, डरबन, २००७
  • २० चेंडू – ईशान किशन विरुद्ध नामिबिया, दिल्ली, २०२६

Web Title : IND vs NAM: ईशान किशन का तूफानी अर्धशतक, भारत की शानदार जीत।

Web Summary : नामीबिया के खिलाफ ईशान किशन का तूफानी अर्धशतक, सिर्फ 20 गेंदों में, भारत के शानदार प्रदर्शन का मुख्य आकर्षण रहा। उनकी आक्रामक बल्लेबाजी ने भारत को टूर्नामेंट में अपना सर्वश्रेष्ठ पावरप्ले स्कोर बनाने में मदद की। उन्होंने 254 की स्ट्राइक रेट से 61 रन बनाए।

Web Title : Ishan Kishan's explosive fifty powers India against Namibia in T20.

Web Summary : Ishan Kishan's blazing half-century against Namibia, reaching the milestone in just 20 balls, highlighted India's dominant performance. His aggressive batting helped India achieve their highest powerplay score in the tournament. He scored 61 runs with a strike rate of 254.