इंग्लंड दौऱ्यावरील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी मैदानात उतरण्यापूर्वी भारतीय संघ बेकेनहॅमच्या मैदानात भारत 'अ' संघाविरुद्ध सराव सामन्यासाठी मैदानात उतरला आहे. या चार दिवसीय सराव सामन्यासाठी टीम इंडियातील खेळाडू काळ्या फिती बांधून मैदानात उतरले. अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघातील खेळाडूंनी सामन्याला सुरुवात होण्याआधी एक मिनिटांचे मौन बाळगत खेळाडूंनी अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील मृत्यांना श्रद्धांजलीही वाहिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लॉर्ड्समध्ये तेच चित्र दिसलं
टीम इंडियाशिवाय लॉर्ड्सच्या मैदानात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीही अहमदाबाद येथील विमान अपघातावर शौक व्यक्त केला. मेगा फायनलच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळात दोन्ही संघातील खेळाडू काळ्या फिती बांधून मैदानात उतरले. खेळाला सुरुवात करण्याआधी दोन्ही संघातील खेळाडूंनी एक मिनिट मौनही पाळत अपघातातील मृत प्रवाशी अन् अन् विमानातील क्रू मेंबर्संना श्रद्धांजली वाहिली.
अहमदाबादच्या विमानतळावरून विमान लंडनच्या दिशेनं झेपावलं, अन्...
गुरुवारी दुपारी अहमदाबादहून लंडनच्या दिशेनं झेपावलेले एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची दुर्घटना घडली होती. एअर इंडिया कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, विमानात २३० प्रवासी होते. त्यातील ६९ भारतीय आणि ५३ ब्रिटिश नागरिकांसह ७ पोर्तुगीज आणि एका कॅनेडियन प्रवाशांचा समावेश होता. याशिवाय १२ क्रू मेंबर्स या विमानात होते. भीषण विमान अपघातात फक्त एकमेव प्रवाशी बचावला आहे.