शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. इंग्लंड दौऱ्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाने धमकही दाखवली. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत पिछाडीवर पडल्यावर अखेरचा कसोटी सामना जिंकत टीम इंडियाने मालिका २-२ अशी बरोबरीत राखण्यात यश मिळवले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
३० महिन्यांपासून टीम इंडियासोबत फिरतोय, पण...
या दौऱ्यात करण नायरला ८ वर्षांनी कमबॅकची तर साई सुदर्शनला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. पण एक चेहरा असा आहे जो पुन्हा दुर्लक्षित झाला. मागील ३० महिन्यांपासून टीम इंडियासोबत फिरत असलेला अभिमन्यू ईश्वरन पुन्हा एकदा बाकावर बसल्याचे पाहायला मिळाले. त्याची टीम इंडियात वर्णी लागल्यापासून अनेक नव्या चेहऱ्यांनी टीम इंडियाकडून पदार्पण केले, पण तो मात्र अजूनही पदार्पणाच्या प्रतिक्षेत आहे. इंग्लंड दौऱ्यावर पुन्हा बाकावर बसायला लागल्यामुळे तो निराश झाला. पण गंभीरनं दिलासा दिला अन् तो टेन्शन फ्री होऊन त्या संधीचं सोन करण्यासाठी पुन्हा कंबर कसून सराव करण्यास तयार झालाय.
कोच गंभीर यांनी दिलाय शब्द!; क्रिकेटरच्या वडिलांनी शेअर केली आतली गोष्ट
अभिमन्यू ईश्वरन याचे वडील रंगनाथन परमेश्वरन यांनी विक्की लालवानीला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये इंग्लंड दौऱ्यानंतर लेकासोबत झालेल्या गोष्टी शेअर केल्या. त्यात त्यांनी गौतम गंभीर यांनी आपल्या लेकाला टीम इंडियात पदार्पणाची संधी देणार असल्याचा शब्द दिल्याचेही सांगितले. इंग्लंड दौऱ्यात पुन्हा बाकावर बसण्याची वेळ आल्यावर तो नाराज होता, पण कोच गंभीर यांनी त्याला दिलासा दिल्यावर तो या संधीची आतुरतेनं वाट बघत आहे, असे क्रिकेटच्या वडिलांनी म्हटले आहे.
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
नेमका प्लॅन काय?
अभिमन्यू आणि कोच गौतम गंभीर यांच्यात झालेल्या संभाषणाबद्दल रंगनाथन परमेश्वरन म्हणाले की, कोच गंभीर त्याला म्हणाले आहेत की, तू चांगला प्रयत्न करतो आहेस. तुला संधी मिळेल. एक-दोन सामने खेळवून तुला बाकावर बसवणार नाही. ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी ती संधी मोठी असेल, अशा शब्दांत कोचिंग टीमनं त्याला लवकरच पदार्पणाची संधी मिळेल, असे सांगत मोठा दिलासा दिला आहे.
३० महिन्यांत १५ खेळाडूंना पदार्पणाची संधी, पण तो...
डिसेंबर २०२२ मध्ये पहिल्यांदा अभिमन्यू ईश्वरन याची टीम इंडियात वर्णी लागली. तेव्हापासून सातत्याने तो टीम इंडियासोबत आहे. पण तो अजूनही पदार्पणाच्या प्रतिक्षेत आहे. त्याची टीम इंडियात वर्णी लागल्यापासून इंग्लंड दौऱ्यापर्यंत जवळपास १५ खेळाडूंनी टीम इंडियाकडून वेगवेगळ्या प्रकारातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
Web Title: IND vs ENG Test Abhimanyu Easwaran Father Emotional Chat With Son After Series Snub He Says Gautam Gambhir Promise Him
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.