भारतीय संघानं चेन्नईच्या एम.ए. चिदम्बरम स्टेडियमवर रंगलेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या संघाला ९ बाद १६५ धावांवर रोखले. फिरकी गोलंदाजांसमोर पाहुण्या इंग्लंड संघानं नांगी टाकली. पण यावेळी इंग्लंडच्या बॅटरची भारतीय स्पिनर विरुद्धची कामगिरी तुलनेत चांगली दिसली. वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २-२ आणि वॉशिंग्टन सुंदर आणि अभिषेक शर्मानं घेतलेल्या एका विकेटसह इंग्लंडच्या संघाने फिरकी गोलंदाजांसमोर ६ विकेट्स गमावल्या. पण मागील ३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्याच्या तुलनेत अधिक धावा करत बॅटर्संनी बरी नव्हे भारी कामगिरी करून दाखवली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जोस बटलर पुन्हा नडला; पण यावेळी अर्धशतकापर्यंत नाही पोहचला
फिल सॉल्ट आणि बेन डकेट या जोडीनं इंग्लंडच्या डावाला सुरुवात केली. अवघ्या ६ धावांवर सॉल्टच्या रुपात अर्शदीप सिंगनं इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरनं डकेटला चालते केले. सलामी जोडी पुन्हा फ्लॉप ठरल्यावर इंग्लंडटचा कॅप्टन जोस बटलरनं पुन्हा एकदा संघाचा जाव सांभाळण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याने ३० चेंडूत ४५ धावांसह डाव सावरलाही . पण त्याला यावेळी अर्धशतकाला काही गवसणी घालता आली नाही. त्याच्याशिवाय ब्रायडन कार्स याने १७ चेंडूत केलेल्या ३१ धावा आणि जेम स्मिथच्या भात्यातून १२ चेंडूत निघालेल्या २२ धावांच्या जोरावर निर्धारित २० षटकात इंग्लंडच्या संघानं ९ विकेट्सच्या मोबदल्यात १६५ धावांपर्यंत मजल मारली.
इंग्लंडच्या संघानं पुन्हा भारतीय फिरकीसमोर टाकली नांगी, पण...
२०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडच्या फलंदाजांनी टीम इंडियाच्या फिरकीसमोर ११ षटकात ५८ धावा करताना ६ विकेट्स गमावल्या होत्या. कोलाकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात स्पिनरसमोरील १२ षटकात ६७ धावांत इंग्लंडच्या संघानं ५ विकेट्स गमावल्या होत्या. चेन्नईच्या मैदानात पुन्हा एकदा सहा फलंदाजांनी फिरकीसमोर नांगी टाकली. पण चेन्नईच्या मैदानात इंग्लंडच्या संघानं फिरकीसमोर ६ विकेट्स गमावताना ११८ धावा केल्याचे पाहायला मिळाले. जे मागील दोन सामन्यांच्या तुलनेत बरे नाही तर भारी ठरते.