Join us

कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना

नवी भूमिका नवे चॅलेंज, शुबमन गिल नवा इतिहास रचणार का?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 18:52 IST

Open in App

Shubman Gill On Getting Team India Test Captaincy : इंग्लंड दौऱ्यातील कसोटी सामन्यासाठी भारतीय कसोटी संघाला नवा कॅप्टन मिळाला आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर जसप्रीत बुमराह, रिषभ पंत आणि केएल राहुल या चर्चेत असणाऱ्या स्टार क्रिकेटर्संना मागे टाकत शुबमन गिलच्या खांद्यावर नवी जबाबदारी आलीये. आयपीएलमध्ये नेतृत्वाची झलक दाखवल्यावर तो कसोटीत आपली छाप सोडण्यास सज्ज झालाय. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पहिल्यांदा कॅप्टन्सी करणार, तेही इंग्लंडच्या मैदानात

इंग्लंडच्या मैदानात खेळणं ही एक मोठी कसोटी असते त्यात पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना त्याच्यावर निश्चितच दबाव असेल. ही मालिका जिंकून तो इतिहास रचणार का? ते पाहण्याजोगे असेल. इंग्लंड विरुद्ध मैदानात उतरण्याआधी शुबमन गिलनं कॅप्टन्सीसंदर्भात मोठं वक्तव्य केले आहे. भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचा कधीच विचार केला नव्हता, असे तो म्हणाला आहे.

बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंटमुळे टीम इंडियात टेन्शन? गंभीरने असे दिले 'त्या' चर्चित प्रश्नाचे उत्तर  मी स्वप्न पाहिले, पण... 

बीसीसीआयने नव्या कॅप्टनचा पहिल्या पत्रकार परिषदे आधीचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात शुबमन गिल आपल्या भावना व्यक्त करताना पाहायला मिळते. यात शुबमन गिल म्हणाला आहे की, मी स्वप्न पाहिले ते भारतीय संघाकडून खेळण्याच. चांगली फलंदाजी करून संघाला मॅच जिंकून देण्याच. पण कॅप्टन व्हायचंय आणि भारतीय संघाचे नेतृत्व करेन हे मी स्वप्नातही पाहिले नव्हते. 

नवी भूमिका नवे चॅलेंज  २५ वर्षीय शुबमन गिलनं आतापर्यंत ३२ कसोटी सामन्यात ३५.०५ च्या सरासरीने १८९३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या भात्यातून ५ शतकांसह ७ अर्धशतके पाहायला मिळाली आहेत. शुबमन गिल हा प्रतिभावंत फलंदाज आहे. पण इंग्लंडमध्ये त्याचा रेकॉर्ड खराब आहे. त्यात आता कॅप्टन्सीची जबाबदारी त्याच्या खांद्यावर पडलीये. इंग्लंडमध्ये आतापर्यंत  फक्त ३ भारतीय कर्णधार संघाला मालिका जिंकून देण्यात यशस्वी ठरले आहेत. खास छाप सोडत तो या पक्तींत बसणार का ते पाहण्याजोगे असेलय

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिलभारतीय क्रिकेट संघ