Mohammed Siraj Storms To Career Best ICC Test Ranking : ओव्हलच्या मैदानातील इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या अन् अखेरच्या कसोटी सामन्यात मॅजिक दाखवणाऱ्या मोहम्मद सिराजलाआयसीसीकडून मोठ गिफ्ट मिळालं आहे. इंग्लंडच्या मैदानातील अविस्मरणीय कामगिरीनंतर ICC च्या कसोटी क्रमवारीत मोहम्मद सिराजनं उंच उडी मारली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नुसती मॅच जिंकून दिली नाही, तर पठ्ठ्यानं इंग्लंड दौरा गाजवला
ओव्हल कसोटी सामन्यातील अखेरच्या दिवसाच्या खेळात ३ विकेट्सचा डाव साधत सिराजनं मारलेला 'पंजा' टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून देणारा ठरला. या सामन्यातील ९ विकेट्स सह सिराज सामावीरही ठरला. एवढेच नाही तर या मालिकेत त्याने सर्वाधिक विकेट्स आपल्या नावे केल्या. कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच सिराजनं एका मालिकेत २३ विकेट्स घेतल्या. त्यामुळे इंग्लंड दौरा सिराजसाठी एकदम खास ठरला. ओव्हलच्या मैदानात मियाँ मजिकनंतर आता मार मुसंडी शो! पाहायला मिळतोय. कारण इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यानंतर ICC नं सिराजला मोठं गिफ्ट दिलं आहे.
करिअरमधील सर्वोत्तम रँकिंग
कसोटी कारकिर्दीत पाच सामन्यांच्या मालिकेतील सर्वोत्तम कामगिरीनंतर मोहम्मद सिराज आयसीसीच्या कसोटीतील गोलंदाजी क्रमवारीत १२ स्थानांनी मुसंडी मारत १५ व्या स्थानी झेप घेतलीये. ही कसोटीतील त्याची सर्वोत्तम रँकिंग आहे. याआधी २०२४ मध्ये तो १६ व्या स्थानापर्यंत पोहचला होता. याशिवाय ओव्हल कसोटीत त्याला उत्तम साथ देणारा प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत ५९ व्या स्थानावर पोहचलाय. ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम रँकिंग ठरलीये.
इंग्लंडच्या मैदानात साधला होता दोन्ही डावांत चारपेक्षा अधिक विकेट्सचा डाव
ओव्हल कसोटी सामन्यातील पहिल्या डावात मोहम्मद सिराजनं ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडच्या संघाला सुरुंग लावताना त्याने पाच विकेट्सचा डाव साधला. झॅक कॉउलीच्या रुपात पहिली विकेट घेणाऱ्या सिराजनेच सामन्यातील शेवटची विकेट घेत टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. दोन्ही डावात चारपेक्षा अधिक विकेट घेणारा भारताचा तो तिसरा गोलंदाज ठरला. याआधी १९६९ मध्ये बिशनसिंह बेदी आणि इरापल्ली प्रसत्ना या दिग्गजांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
कसोटीत गोलंदाजीमध्ये बुमराह अव्वल
इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह फक्त ३ सामन्यासाठी मैदानात उतरला. यात त्याने १४ विकेट्स घेतल्या. तो ज्या सामन्यात खेळला त्यातील एकही सामना टीम इंडियाने जिंकला नाही. पहिल्या सामन्यातील पाच विकेट्सची कामगिरी वगळता बुमराहला या दौऱ्यात अपेक्षित छाप सोडता आली नाही. तरी जसप्रीत बुमराह ICC च्या कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी कायम आहे. त्याच्या खात्यात ८८९ रेटिंग पाँइंट्स असून या यादीत दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा (८५१ रेटिंग) आणि ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स (८३८ रेटिंग) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.