KL राहुल 'नॅशनल ड्युटी स्टार्ट विथ ब्युटीफुल सेंच्युरी'! १८ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची दिली 'गॅरेंटी'

भारत 'अ' आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील सामन्यात  लोकेश राहुलनं (KL Rahul Century)  इंग्लंडच्या गोलंदाजांचा क्लास घेत आपल्या भात्यातील कडक फटकेबाजीचा नजराणा पेश केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 12:20 IST2025-06-07T12:15:59+5:302025-06-07T12:20:04+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG KL Rahul Starts England Tour With Century vs Lions Big Relief For Team India Ahead Of Five Matches Test Series | KL राहुल 'नॅशनल ड्युटी स्टार्ट विथ ब्युटीफुल सेंच्युरी'! १८ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची दिली 'गॅरेंटी'

KL राहुल 'नॅशनल ड्युटी स्टार्ट विथ ब्युटीफुल सेंच्युरी'! १८ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची दिली 'गॅरेंटी'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

KL Rahul Century : इंग्लंड दौऱ्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसह भारतीय कसोटी संघाच्या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर या दौऱ्यात लोकेश राहुल यशस्वी जैस्वालसह भारतीय संघाच्या डावाला सुरुवात करताना दिसू शकतो. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलवर संघाची मोठी जबाबदारी असेल. सध्याच्या घडीला तो संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. जबाबदारीची जाणीव लक्षात घेत लोकेश राहुल मुख्य संघातील खेळाडूंसह इंग्लंडला जाण्याऐवजी आधीच तिथं पोहचला. आयपीएल स्पर्धेत बॅटिंगमधील क्लास दाखवल्यावर भारतीय 'अ' संघाकडून इंग्लंड लायन्स विरुद्धच्या अनपौचारिक कसोटीतून त्याने ब्युटीफुल सेंच्युरीसह नॅशनल ड्युटी बजावण्यासाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

शतकी खेळीसह KL राहुलनं इंग्लंड दौरा गाजवण्याचे दिले संकेत

भारत 'अ' आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील सामन्यात  लोकेश राहुलनं (KL Rahul Century)  इंग्लंडच्या गोलंदाजांचा क्लास घेत आपल्या भात्यातील कडक फटकेबाजीचा नजराणा पेश केला. केएल राहुलनं या सामन्यात यशस्वी जैस्वालच्या साथीनं भारतीय 'अ' संघाच्या डावाची सुरुवात केली.  यशस्वी अवघ्या २६ चेंडूत १७ धावा करून तंबूत परतल्यावर केएल राहुल मैदानात तग धरून उभा राहिला. करुण नायर, ध्रुव जुरेल यांच्या साथीनं छोटी छोटी भागीदारी करत त्याने १५१ चेंडूत शतक पूर्ण केले. पहिल्या डावात तो ११६ धावांवर बाद झाला.  त्याची ही खेळी टीम इंडियाला मोठा दिलासा देणारी आहे.

जर असं घडलं तर विराट कोहली पुन्हा कसोटी खेळण्यास तयार होईल! या दिग्गजानं केला मोठा दावा

१८ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची जबाबदारी

भारतीय संघाचा इंग्लंडमधील कसोटी रेकॉर्ड हा खूपच खराब आहे. दिलीप वेंगसरकर, कपिल देव आणि राहुल द्रविड हे तीन कर्णधार सोडले तर अन्य कोणत्याही कर्णधाराच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकलेली नाही. २००७ मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इथं अखेरची कसोटी मालिका जिंकली होती. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ १८ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी मैदानात उतरेल. हे मिशन फत्तेह करण्यासाठी लोकेश राहुलवर मोठी जबाबदारी असेल. शतकी खेळीसह इंग्लंड दौऱ्याची सुरुवात करत त्याने दुष्काळ संपवण्याची गॅरेंटी देणारी खेळी साकारलीये. 
 

Web Title: IND vs ENG KL Rahul Starts England Tour With Century vs Lions Big Relief For Team India Ahead Of Five Matches Test Series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.