इंग्लंड-भारत यांच्यात अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील एजबॅस्टनच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने यजमान इंग्लंडला ३३६ धावांनी पराभूत केले. या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने आपल्या संघाच्या खराब कामगिरीशिवाय खेळपट्टीला दोष दिला. खरंतर हा प्रकार म्हणजे 'नाचता येईना अंगण वाकडे' असाच काहीसा होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियााल टेन्शन देण्यासाठी "हिरवे हिरवे गार गालिचे.."
आता टीम इंडियाने मालिकेत बरोबरी साधल्यावर यजमानांनी लॉर्ड्सच्या मैदानात टीम इंडियाचं टेन्शन वाढवण्यासाठी "हिरवे हिरवे गार गालीचे.." असा माहोल तयार केला आहे. लॉर्ड्सच्या खेळपट्टीवरील गवत हे तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी ही गोलंदाजांवर मेहरबान होणार, याचे संकेत देणारी आहे. पण टीम इंडियाकडे या टेन्शनवरचीही मात्रा आहे. भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक यांनी खेळपट्टी पाहिल्यावर तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया या आव्हानाचा सामना करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
खेळपट्टी गोलंदाजांना साथ देईल, पण... लॉर्ड्सच्या मैदानात रंगणाऱ्या कसोटी सामन्याआधी ८ जुलैला टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले आहेत की, खेळपट्टीवर खूप गवत आहे. मॅचच्या आधी गवत थोडे कमी करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतरच खेळपट्टीचा अंदाज लावणं शक्य होईल. खेळपट्टी पाहिल्यावर इथं गोलंदाजांना मदत मिळणार हे निश्चित आहे. या परिस्थितीत फलंदाज कोणत्या मानसिकतेसह मैदानात उतरणार ते महत्त्वाचे असेल. जर फलंदजाने जोखीम न घेता चुकाचा फटका निवडणं टाळलं तर इथं फलंदाजांना फारशी समस्या भासेल, असे वाटत नाही.
...तर फलंदाजांना फारशी समस्या येणार नाही
लॉर्ड्सच्या मैदानात रंगणाऱ्या कसोटी सामन्याआधी ८ जुलैला टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले आहेत की, खेळपट्टीवर खूप गवत आहे. मॅचच्या आधी गवत थोडे कमी करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतरच खेळपट्टीचा अंदाज लावणं शक्य होईल. खेळपट्टी पाहिल्यावर इथं गोलंदाजांना मदत मिळणार हे निश्चित आहे. या परिस्थितीत फलंदाज कोणत्या मानसिकतेसह मैदानात उतरणार ते महत्त्वाचे असेल. जर फलंदाजाने जोखीम न घेता चुकाचा फटका निवडणं टाळलं तर इथं फलंदाजांना फारशी समस्या भासेल, असे वाटत नाही.
फलंदाजांना सल्ला
लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर फलंदाजांची मानसिकता खूप महत्त्वाची आहे. मैदानात तग धरण्यावर भर दिला तर परिस्थितीत हाताळण्यास मदत होईल. जर ही क्षमता दाखवली नाही तर जगातील कोणत्याच खेळपट्टीवर फलंदाजाचा निभाव लागणं मुश्किल असते, असे सांगत मैदानात धैर्यानं खेळण्याचा सल्ला टीम इंडियाच्या प्रशिक्षकांनी फलंदाजांना दिला आहे.