IND vs ENG, Gautam Gambhir Unhappy With Wankhede Pitch : विश्वचषक २०२६ स्पर्धेीतल उपांत्य फेरीतील दुसरा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येणार आहे. मुंबईतील वानखेडेच्या मैदानात रंगणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. या सामन्याआधी भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर खेळपट्टीवरून नाराज असल्याची चर्चा रंगू लागली आहे. सोशल मीडियावर गौतम गंभीर आणि पिच क्युरेटर यांच्यातील चर्चेचे काही फोटो व्हायरल होत आहेत. यात गौतम गंभीर नाखुश दिसत आहे. इथं जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वानखेडेच्या खेळपट्टीसंदर्भात 'गंभीर' चर्चा
मुंबईत भारतीय संघाचे सराव सत्र पार पाडले. सरावादरम्यान मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पिच क्यूरेटरसोबत खेळपट्टीसंदर्भात चर्चा करताना दिसून आले. वानखेडेची खेळपट्टी भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकते, असे चित्र पाहायला मिळाले. जी माहिती समोर येत आहे त्यानुसार, यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत विरुद्ध अमेरिका यांच्यातील सामना ज्या खेळपट्टीवर खेळवण्यात आला त्याच खेळपट्टीवर भारत-इंग्लंड यांच्यातील सामना रंगणार आहे. सलामीच्या लढतीत अमेरिकेन गोलंदाजांनी टीम इंडियाला अडचणीत आणले होते. या मुद्यावरून भारतीय प्रशिक्षक नाराज असण्याची शक्यता आहे.
खेळपट्टी उत्तम वाटते, पण...
भारत-इंग्लंड यांच्यातील सामना ज्या खेळपट्टीवर खेळवण्यात येणार आहे ती हार्ड आणि बाऊन्सी असल्याचे दिसत आहे, जे चांगल्या आणि स्पर्धात्मक विकेटचे संकेत मानले जातात. पण तरीही भारतीय संघाचा प्रशिक्षक मात्र या खेळपट्टीवर असमाधानी असल्याचे दिसते. अधिकृतरित्या नाराजी व्यक्त केली नसली तरी सरावा दरम्यान गौतम गंभीरच्या चेहऱ्यावरील भाव हे टीम इंडियासाठी खेळपट्टी आव्हानात्मक असल्याचे चित्र निर्माण करणारी आहे.
कोण मारणार बाजी?
भारतीय संघाने यंदाच्या हंगामात साखळी फेरीत अपराजित राहून सुपर ८ फेरीत प्रवेश केला. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर मात्र पुन्हा टीम इंडियाने दमदार कमबॅक करत उपांत्य फेरी गाठली आहे. वानखेडेच्या मैदानात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात धमाकेदार कामगिरी करून टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा फायनल गाठण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. भारत-इंग्लंड दोन्ही संघ सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत भिडणार आहेत. याआधी दोन्ही संघांनी प्रत्येकी १-१ सामना जिंकला असून आघाडी घेऊन फायनल कोण गाठणार? ते पाहण्याजोगे असेल.
Web Summary : Ahead of the India-England semi-final, coach Gautam Gambhir seems displeased with the Wankhede pitch. Concerns arise as the match might be played on the same pitch used previously. Despite its bouncy nature, Gambhir's expressions suggest potential challenges for Team India.
Web Summary : भारत-इंग्लैंड सेमीफाइनल से पहले कोच गौतम गंभीर वानखेड़े की पिच से नाखुश दिख रहे हैं। चिंताएँ उठती हैं क्योंकि मैच पहले इस्तेमाल की गई पिच पर खेला जा सकता है। पिच की उछाल के बावजूद, गंभीर के भाव टीम इंडिया के लिए संभावित चुनौतियों का संकेत देते हैं।