Join us

बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंटमुळे टीम इंडियात टेन्शन? गंभीरने असे दिले 'त्या' चर्चित प्रश्नाचे उत्तर

याशिवाय जसप्रीत बुमराह पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील किती सामने खेळणार हा विषय सध्या चर्चेत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 17:40 IST

Open in App

IND vs ENG Gautam Gambhir On Jasprit Bumrah : शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेतून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या चौथ्या हंगामाची सुरुवात करणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी निवृत्ती घेतल्यामुळे त्यांची जागा कोण घेणार? याशिवाय जसप्रीत बुमराह पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील किती सामने खेळणार हा विषय सध्या चर्चेत आहे. त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंट करताना टीम इंडियाचं टेन्शन वाढणार का? त्याची जागा कोण भरून काढेल? असे अनेक प्रश्न इंग्लंड दौऱ्याआधी चर्चेत आहेत.   

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

बुमराह किती सामने खेळणार? गंभीरनं असं दिलं उत्तर

इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य गौतम गंभीर याने यावर भाष्य केले आहे. आगामी सामन्यात जसप्रीत बुमराह हा ३ कसोटी सामन्यात तरी खेळेल, असे गौतम गंभीरनं म्हटले आहे. पण ते ३ सामने कोणते ते अद्याप ठरलेले नाही, असेही त्याने सांगितले. जसप्रीत बुमराह हा संघातील प्रमुख गोलंदाज आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत संघात सक्षम पर्यायही आहेत, या गोष्टीवरही त्याने जोर दिला आहे.

IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...

बुमराहची रिप्लेसमेंट कठीण; पण... नेमकं काय म्हणाला गंभीर?

इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाची घोषणा झाली त्यावेळीच बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी जसप्रीत बुमराह हा या दौऱ्यावर सर्व पाच सामने खेळणार नाही, असे म्हटले होते. शुबमन गिल आणि गौतम गंभीर यांच्या पत्रकार परिषदेत ज्यावेळी बुमराहसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी गौतम गंभीर म्हणाला की, जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट कठीण आहे. पण संघात प्रतिभावंत गोलंदाज आहेत जे त्याच्या अनुपस्थितीत संघासाठी उपयुक्त कामगिरी करु शकतात. 

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचाही दिला दाखला

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाला बुमराहशिवायच मैदानावर उतरावे लागले होते. त्याच्या अनुपस्थितीत संघाने ट्रॉफीही जिंकली. हाच धागा पकडून गंभीर म्हणाला की, मी याआधीही (चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान) म्हणालो होतो की, तो नसेल तर ही अन्य कुणासाठी तरी एक चांगली संधी असेल. संघात प्रतिभावंत गोलंदाजांचा अतिरिक्त पर्याय आहे.

 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५जसप्रित बुमराहशुभमन गिलगौतम गंभीर