Gautam Gambhir Viral Video, Ind vs Eng 3rd Test: टीम इंडियाला लॉर्ड्स कसोटीत १९३ धावांचे आव्हान मिळाले. आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची गाडी रूळावरून घसरली. भारताने शंभरी गाठण्याआधीच ७ बळी गमावले. शुभमन गिलचा कर्णधार म्हणून आणि गौतम गंभीरचा कोच म्हणून हा लॉर्ड्सवरील पहिलाच कसोटी सामना आहे. त्यामुळे भारताने लॉर्ड्सवर तिरंगा फडकावला, तर टीम इंडियाचे ते खूपच आनंदाचे ठरेल. पण त्याआधी गौतम गंभीरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये गंभीर लॉर्ड्सच्या बाल्कनीत बसून अपशब्द उच्चारताना दिसत आहे. लाईव्ह सामन्यातील त्याचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
गौतम गंभीरने उच्चारला अपशब्द, व्हिडिओ व्हायरल
गौतम गंभीरचा व्हायरल होणारा व्हिडिओ लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवसाचा असल्याचे दिसते. जेव्हा इंग्लंड आपला दुसरा डाव खेळत होता आणि टीम इंडिया क्षेत्ररक्षण करत होती, तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओमधील चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्ही स्पष्टपणे अंदाज लावू शकता की गौतम गंभीर काय म्हणाला असेल. त्याने लाईव्ह सामन्यात अपशब्द वापरले आहेत म्हणजेच शिवीगाळ केली आहे. पाहा व्हिडीओ-
गंभीरने कोणाला दिली शिवी?
आता प्रश्न असा आहे की, व्हायरल व्हिडिओमध्ये टीम इंडियाचा कोच गौतम गंभीर कोणाला शिवीगाळ करत आहे? त्याला इतका कसला राग आला आहे? दरम्यान, या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे नाहीत, परंतु फुटेज पाहता असे दिसते की गंभीर भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवरच नाखुश असून चिडचिड करत आहे.