IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

पंतच्या जागी टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 19:13 IST2025-07-29T19:02:27+5:302025-07-29T19:13:13+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 5th Test Oval Who Will Be Team India Wicket Keeper I This Match Dhruv Jurel or Narayan Jagadeesan Know Both Players Stats And Record | IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ENG 5th Test, Dhruv Jurel or N Jagadeesan  Both Players Stats And Record : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना लंडन येथील ओव्हलच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कारण दुखापतीमुळे रिषभ पंत उर्वरित सामन्याला मुकणार आहे. मँचेस्टरच्या मैदानात सामन्यात बरोबरी साधल्यावर आता टीम इंडियासमोर मालिका बरोबरीत राखण्यासाठी ओव्हलच्या मैदानातील सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये विकेट किपर बॅटरच्या रुपात कुणाला संधी मिळणार? हा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पंतच्या जागी टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री, पण...

भारतीय संघाने रिषभ पंतच्या जागी विकेट किपर बॅटरच्या रुपात एन जगदीशन याला संघात सामील करून घेतले आहे. संघात लेट एन्ट्री झाल्यावर या नव्या चेहऱ्याला पदार्पणाची संधी मिळेल, अशीही चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगताना दिसते. पण आधीपासून संघात असलेल्या ध्रुव जुरेल पंतच्या जागेसाठी पहिला दावेदार असेल.

"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट

बाकावरच बसला, पण पंतच्या जागी विकेट किपिंग करताना दिसला

ध्रुव जुरेल हा टीम इंडियातील अन्य खेळाडूंच्या आधी इंग्लंड दौऱ्यावर पोहचला होता. भारत 'अ' संघाकडून त्याने इंग्लंड लायन्स विरुद्धच्या कसोटी सामन्यात बॅटिंगमधील धमकही दाखवली. पण पंत असल्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये काही स्थान मिळाले नाही. लॉर्ड्स पाठोपाठ मँचेस्टरच्या मैदानात पंतच्या दुखापतीनंतर विकेट किपिंगची जबाबदारी ही ध्रुव जुरेलच्या खांद्यावर येऊन पडली. दोन कसोटीत फक्त फिल्डिंग करणाऱ्या या गड्याला पाचव्या सामन्यात तरी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पसंती मिळणार का? ते पाहण्याजोगे असेल.

एक नजर ध्रुव जुरेल अन् एन जगदीशन यांच्या कामगिरीवर

ध्रुव जुरेल याने आतापर्यंत ४ कसोटी सामने खेळले असून ४०.४० च्या सरासरीसह त्याने  २०२ धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेस आहे. विकेट मागे त्याने ६ झेलसह आणि दोघांना यष्टिचित केले आहे. दुसऱ्या बाजूला  नारायण जगदीशन कसोटीत पदार्पणाच्या प्रतिक्षेत आहे. एन जगदीशन याने ५२ प्रथम श्रेणी सामन्यात ३३७३ धावा आणि १३३ झेल टिपले आहेत. याशिवाय १४ फलंदाजांना त्याने यष्टिचित केल्याचाही रेकॉर्ड आहे.  

Web Title: IND vs ENG 5th Test Oval Who Will Be Team India Wicket Keeper I This Match Dhruv Jurel or Narayan Jagadeesan Know Both Players Stats And Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.