IND vs ENG 5th Test Irfan Pathan Reacts To Gautam Gambhir Oval Curator Controversy : लंडन येथील द ओव्हलच्या मैदानात रंगणाऱ्या भारत-इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि पिच क्युरेटर ली फोर्टिस यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरत आहे. या वादावर आता माजी क्रिकेटर आणि विद्यमान समालोचक इरफान पठाण याने प्रतिक्रिया दिली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
काय म्हणाला इरफान पठाण?
हे वसाहतवाद युग आहे का? असा प्रश्न उपस्थितीत करत इरफान पठाण याने इंग्रज पिच क्युरेटरला सुनावलं आहे. इंग्लंडच्या प्रशिक्षकाला सूट दिली अन् भारतीय प्रशिक्षकाला रोखलं, असा उल्लेखही माजी भारतीय क्रिकेटरनं केलाय. इरफान पठाण याने एक्स अकाउंटवरून एक ट्विट केलंय, यात त्यानं लिहलंय की, इंग्लंडच्या प्रशिक्षकाला खेळपट्टी पाहण्याची मुभा आहे का? मग भारतीय प्रशिक्षकालाच का रोखलं? तुम्ही अजूनही वसाहतवाद युगात जगताय का? अशा शब्दांत इरफान पठाण याने पिच क्युरेटरच्या दुटप्पी भूमिकेवर राग व्यक्त केला आहे.
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
...अन् ओव्हलच्या मैदानात सामन्याआधी पडली वादाची ठिणगी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि ओव्हलचे मुख्य पिच क्यूरेटर ली फोर्टिस यांच्यात मंगळवारी मैदानात शाब्दिक वाद रंगल्याचे पाहायला मिळाले होते. फोर्टिस यांनी भारतीय सहाय्यक स्टाफला खेळपट्टीपासून २.५ मीटर लांब थांबण्याचा सल्ला दिला अन् ओव्हलच्या मैदानात सामन्याआधी वादाची ठिणगी पडली. गंभीरनं आक्रमक पवित्रा घेत पिच क्युरेटरवर भडकल्याचे पाहायला मिळाले. टीम इंडियाच्या ताफ्यातील बॅटिंग कोच सितांशु कोटक यांनी मध्यस्थी करत हे प्रकरण मिटवल्याचे पाहायला मिळाले होते.
खेळपट्टी खराब होण्याचा प्रश्नच नव्हता, पण...
खेळपट्टीच्या पाहणी दरम्यान मैदानात घडलेल्या प्रकाराबद्दल सितांशु कोटक म्हणाले आहेत की, ज्यावेळी आम्ही खेळपट्टीची पाहणी करत होतो त्यावेळी एक ग्राउंड्समन आमच्याकडे आला अन् त्याने आम्हाला खेळपट्टीपासून २.५ मीटर अंतर राखण्याचा सल्ला दिला. रस्सीच्या बाहेरून विकेट पाहा, असे तो म्हणाला. भारतीय ताफ्यातील कुणीच तिथं स्पाइक घालून गेले नव्हते. त्यामुळे खेळपट्टी खराब होण्याचा प्रश्नच नव्हता. असा प्रकार मी याआधी कधीच पाहिला नाही, असेही ते म्हणाले आहेत.