Lee Fortis Statement on Gautam Gambhir : इंग्लंड आणि भारत यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना लंडन येथील ओव्हलच्या मैदानात रंगणार आहे. ३१ जुलै पासून खेळवण्यात येणारा सामना जिंकून मालिका बरोबरीत करण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. दुसरीकडे हा सामना न गमावता मालिका खिशात घालण्यासाठी यजमान इंग्लंड संघ प्रयत्नशील असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं
दोन्ही संघातील लढतीआधी भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि पिच क्युरेटर यांच्यात सामना रंगल्याचे पाहायला मिळत आहे. गौतम गंभीर आणि ओव्हलचे पिच क्यूरेटर ली फोर्टिस यांच्यातील वाद आता चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर दोघांच्यातील वादाचा व्हिडिओ व्हायरल होत असताना यावर पिच क्युरेटरची प्रतिक्रियाही समोर आली आहे. जाणून घेऊयात नेमकं काय घडलं? त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
नेमकं काय घडलं?
भारतीय संघातील खेळाडू सरावासाठी मैदानात उतरल्यावर पिच क्युरेटर सरावासाठी कोणती खेळपट्टी वापरायची? नेट कोणत्या ठिकाणी सेट करायचं? यासंदर्भातील सूचना करताना दिसले. ही गोष्ट टीम इंडियाचे कोच गौतम गंभीर यांना खटकली. आम्ही काय करायचे ते तुम्ही सांगण्याची गरज नाही, असे म्हणत गंभीर पिच क्युरेटरवर भडकला. मैदानातील वातावरण तापल्यावर टीम इंडियाचे बॅटिंग कोच सितांशु कोटक यांनी मध्यस्थी केली. पिच क्युरेटरनं मॅच रेफ्रीला तक्रार करेन, असे म्हटल्यावर गंभीरनं कुणाला काय सांगायचं ते सांग चल नीघ... अशा शब्दांत पिच क्युरेटरवर राग व्यक्त केला.
जे घडलं ते सर्वांना पाहिलं
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पिच क्युरेटरनं नेमकं काय घडलं? त्याबद्दल स्पष्ट प्रतिक्रिया देणं टाळलं. मोठा सामना होणार आहे. गंभीरच्या मनासारखं करणं हे माझं काम नाही. आमची ही पहिलीच भेट होती. कोण काय बोलले ते सर्वांनी पाहिलं आहे. यात लपवण्यासारखं काही नाही, अशा शब्दांत ली फोर्टिस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.