IND vs ENG 3rd Test : भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत सलग तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा युवा कर्णधार शुबमन गिल याने टॉस गमावल्याचे पाहायला मिळाले. बेन स्टोक्सनं पुन्हा एकदा टॉस जिंकला. पण यावेळी त्याने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय कर्णधाराच्या नावेच आहे कसोटीत सर्वाधिक वेळा टॉस गमावण्याचा रेकॉर्ड
कसोटी क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक वेळा टॉस गमावण्याचा कर्णधारांच्या यादीत भारतीय संघाचे एक नाही तर दोन कर्णधार संयुक्तरित्या अव्वलस्थानी आहेत. महेंद्रसिंह धोनीनं २०१० मध्ये कसोटीत सलग ९ वेळा टॉस गमावल्याचा रेकॉर्ड आहे. याशिवाय लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी १९८१-८२ च्या कालावधीत सलग ९ वेळा टॉस गमावला होता.
प्रसिद्ध कृष्णा आउट, जसप्रीत बुमराहचं कमबॅक
इंग्लंडच्या संघाने तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन एक दिवस आधीच जाहीर केली होती. दुसरीकडे भारतीय संघ या सामन्यासाठी एका बदलासह मैदानात उतरला आहे. दुसऱ्या सामन्यातील विश्रांतीनंतर जसप्रीत बुमराहची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली असून प्रसिद्ध कृष्णाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
लॉर्ड्स कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, करूण नायर, शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक/ उप कर्णधार), नीतीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन : जॅक क्रॉउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर.