नशीब असावं तर शुबमन गिलसारखं! काहीही झालं तरी संघाबाहेर काढणं कठीण, कारण...

गिल कसोटीत सातत्याने फलंदाजीत नापास तरीही मिळतेय संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 09:25 AM2024-01-30T09:25:50+5:302024-01-30T09:26:41+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 2nd Test Shubman Gill lucky poor form kl Rahul injured team India playing 11 | नशीब असावं तर शुबमन गिलसारखं! काहीही झालं तरी संघाबाहेर काढणं कठीण, कारण...

नशीब असावं तर शुबमन गिलसारखं! काहीही झालं तरी संघाबाहेर काढणं कठीण, कारण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shubman Gill, Team India Playing XI, IND vs ENG 2nd Test : भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरूद्ध धक्कादायक प्रकारे पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघाने कसोटीच्या सुरुवातीपासून सामन्यावर वर्चस्व गाजवले होते. पहिल्या दोन दिवसात भारतीय संघ सामना सहज जिंकेल अशी अपेक्षा होती. पण तिसऱ्या दिवशी  इंग्लंडच्या ओली पोपने १९६ धावांची खेळी केली तर चौथ्या दिवशी शेवटच्या डावात इंग्लंडच्या हार्टलीने ७ बळी घेत भारताच्या फलंदाजीची धूळधाण उडवली. त्यामुळे भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले. भारताच्या पराभवानंतर शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्यावर प्रचंड टीका केली जात आहे. सातत्याने अपयशी ठरणाऱ्या शुबमन गिलला संघाबाहेर काढा अशी मागणीही सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. कदाचित संघ व्यवस्थापनालाही याबाबतचा निर्णय घ्यावासा वाटत असेल, पण सध्या शुबमन गिलचे नशीब त्याला इतक्या चांगल्या प्रकारे साथ देत आहे की, रोहित-द्रविडला वाटत असूनही ते त्याला संघाबाहेर काढू शकत नाहीत. त्यामागे एक खास कारण आहे.

सध्याचा गिलचा फॉर्म पाहता गिलला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याची मागणी रास्त वाटते. पण असे असले तरी 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत तो खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. पहिल्या कसोटीत अपयशी ठरल्यानंतरही आणि कर्णधार रोहित व प्रशिक्षक राहुल द्रविड यांना इच्छा असूनही त्याला वगळता येत नाही हे गिलचे नशीब म्हणता येईल. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे केएल राहुल.

हैदराबादमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या राहुलने सामन्यानंतर मांडीच्या दुखापतीचे कारण दिले आणि दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली. बीसीसीआयने राहुलच्या जागी सर्फराज खानचा संघात समावेश केला आहे. शिवाय रजत पाटीदार आणि ध्रुव जुरैल हेही चमूत आहेत. या तिघांपैकी एक खेळणार हे निश्चित आहे, पण अडचण इथेच आहे, त्यामुळे गिलचे खेळणे जवळपास निश्चित झाले आहे. तिघांनीही अजून एकही कसोटी खेळलेली नाही. त्यात राहुल, जाडेजा आणि विराट संघाबाहेर आहेत. अशा परिस्थितीत तिघांना एकदम पदार्पणाची संधी देऊन अनुभवही मधली फळी खेळवण्याची जोखीम रोहित-द्रविडला परवडण्यासारखी नाही. गिल फॉर्ममध्ये नसला तरी त्याच्याकडे खूप अनुभव आहे आणि हिच बाब त्याच्या दृष्टीने फायद्याची ठरू शकते. म्हणून अशा स्थितीत त्याला आणखी एका संधी मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

Web Title: IND vs ENG 2nd Test Shubman Gill lucky poor form kl Rahul injured team India playing 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.