Join us

नंबर 1 टेस्ट गोलंदाज बनताच जसप्रीत बुमराहची 'बोलकी' इन्स्टा स्टोरी; कुणावर साधला निशाणा? 

Jasprit Bumrah Cryptic Instagram Story: ICC च्या ताज्या क्रमवारीत बुमराह नंबर १ कसोटी गोलंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 09:53 IST

Open in App

Jasprit Bumrah Cryptic Instagram Story: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आता कसोटी फॉरमॅटमध्ये जगातील नंबर 1 वेगवान गोलंदाज बनला आहे. बुधवारी आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत बुमराहने अव्वल स्थान पटकावून भारतीयांना आनंदाचा धक्का दिला. जागतिक क्रमवारीत जसप्रीत बुमराहने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली, ज्यामुळे सर्वजण गोंधळात पडले. बुमराहने यातून नक्की कोणाला लक्ष्य केले आहे का, असा सवाल साऱ्यांनाच पडला आहे.

जसप्रीत बुमराहने एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने दोन फोटो पोस्ट करून त्यात तुलना केली आहे. ज्यावेळी वाईट दिवस सुरु असतात तेव्हा पाठिंबा देणारे केवळ मोजकेच लोक असतात, पण जेव्हा आपण एखाद्या कामात यशस्वी होतो त्यावेळी अभिनंदन करण्यासाठी मात्र संपूर्ण जग गर्दी करते, अशा आशयाची ही इन्स्टा स्टोरी आहे. या स्टोरीचा अर्थ सरळ असला तरी त्यातून त्याने कोणाला लक्ष्य केले आहे, याबाबत मात्र प्रश्न उपस्थित होत आहेत.

जसप्रीत बुमराहच्या या पोस्टकडे टोमणा म्हणून पाहिले जात आहे. कारण जसप्रीत बुमराहला काही काळापूर्वी खूप ट्रोल केले जात होते, जेव्हा तो दुखापतीत होता. त्यावेळी सोशल मीडियावर बुमराह हा फक्त IPL दरम्यान फिट असतो, बाकीच्या काळात तो दुखापतीने त्रस्त असतो आणि त्यामुळे तो टीम इंडियाकडून खेळत नाही, असे मीम्स बनवण्यात आले होते. पण आता मात्र बुमराहने कसोटी सामन्यात भारताला विजय मिळवून दिला आणि स्वत:ची गोलंदाजी पुन्हा एकदा सिद्ध झाली.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजसप्रित बुमराहआयसीसीइन्स्टाग्राम