IND vs ENG, 2nd T20 : Big News; इशान किशन, सूर्यकुमार यादव आज करणार पदार्पण; कोणाचा पत्ता होईल कट?

Ind Vs Eng 2nd T20 Match Today : भारत-इंग्लंड पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात ( India vs England T20I) विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखाली टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला होता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 06:20 PM2021-03-14T18:20:08+5:302021-03-14T18:25:26+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 2nd T20 : Ishan Kishan and Suryakumar Yadav have been handed their caps. Looks like two debuts for India today | IND vs ENG, 2nd T20 : Big News; इशान किशन, सूर्यकुमार यादव आज करणार पदार्पण; कोणाचा पत्ता होईल कट?

IND vs ENG, 2nd T20 : Big News; इशान किशन, सूर्यकुमार यादव आज करणार पदार्पण; कोणाचा पत्ता होईल कट?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng 2nd T20 Match Today : भारत-इंग्लंड पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात ( India vs England T20I) विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखाली टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला होता. हा पराभव मागे टाकून टीम इंडिया आज पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Cricket Stadium in Ahmedabad) हा सामना रंगणार आहे. विराट कोहली पहिल्या सामन्यातील पराभवातून धडा घेत, आजच्या सामन्यात रोहित शर्माला ( Rohit Sharma) खेळवतो का?, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यात सामन्यापूर्वी इशान किशन ( Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांना टीम इंडियाची कॅप देण्यात आली. आजच्या सामन्यात त्यांच्या पदार्पणाची शक्यता निर्माण झाली आहे. Ind Vs Eng 2nd T20 Live Update Score

पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियाला २० षटकांत ७ बाद १२४ धावा करता आल्या. शिखर धवन ( ४), लोकेश राहुल ( १) व विराट कोहली ( ०) हे अपयशी ठरल्यानंतर श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) डाव सावरला. त्यानं ६७ धावांची खेळी केली. रोहितच्या अनुपस्थितीत धवन व राहुल सलामीला आले परंतु त्यांना अपयश आलं. भारताचे ३ फलंदाज २० धावांवर माघारी परतले होते. तरीही टीम इंडियानं १२४ धावा केल्या. इंग्लंडने हा सामना १५.३ षटकांत सहज जिंकला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. Ind Vs Eng 2nd T20 Live Score, Ind vs Eng Live Score Today

कोणाला मिळेल डच्चू?
इशान किशन व सूर्यकुमार यादव संघात आल्यास अक्षर पटेल आणि रिषभ पंत यांना विश्रांती दिली जाऊ शकते. याशिवाय रोहित शर्मा अंतिम ११ मध्ये परतल्यास शिखर धवनला डच्चू दिला जाऊ शकतो.  

Web Title: IND vs ENG, 2nd T20 : Ishan Kishan and Suryakumar Yadav have been handed their caps. Looks like two debuts for India today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.