Join us

पुन्हा 'वाजले की बारा' त्याला राहू दे ना घरी; फ्लॉप शोनंतर हिटमॅन रोहित शर्मा पुन्हा ट्रोल

सोशल मीडियावर रोहितला ट्रोल करण्याची जणू लाटच उसळल्याचे दिसते. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 23:19 IST

Open in App

Rohit Sharma Poor Performance Continue : इंग्लंड विरुद्धच्या वनडे सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला. पण या सामन्यात रोहित शर्मा पुन्हा अपयशी ठरला. मॅच जिंकल्यामुळे ६ सामन्यानंतर रोहित शर्माला थोडासा दिलासा मिळाला असला तरी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या तोंडावर रोहित शर्माचा फ्लॉप शो बघून क्रिकेट चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा रोहित शर्मावर निशाणा साधल्याचे दिसते. सोशल मीडियावर रोहितला ट्रोल करण्याची जणू लाटच उसळल्याचे दिसते. 

रोहित शर्माला नेटकऱ्यांनी पुन्हा दिला निवृत्तीचा सल्ला

बॅटिंगसाठी मैदानात आल्यावर रोहित शर्मा तग धरण्याचा प्रयत्न करतोय. पण काही चेंडूचा धनी होऊन तो स्वस्तात माघारी फिरताना दिसतोय. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात पुन्हा तेच झालं. तो फक्त २ धावांची भर घालून तंबूत परतला. वनडे मालिकेआधी रोहित शर्मानं रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सामनाही खेळला होता तिथंही त्याची डाळ काही शिजली नाही. नागपूरच्या मैदानात तरी तो टोलर्संना उत्तर देईल. आणि निवृत्तीच्या चर्चेला पूर्णविराम देईल, असे वाटत होते. पण ते झालेच नाही. तो आला आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या गाणं वाजवून मोकळा झाला. निवृत्तीच्या मुद्यावर रोहित शर्माचा सूर अजून थांबायचं नाही असाच आहे. ते त्याने मॅचआधी बोलूनही दाखवलं. पण त्याचा फ्लॉप शो बघितल्यावर मैदानात थांबत नसलेल्या रोहितला संघातच घेऊ नये, अशा अर्थाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

रोहितनं लवकरात लवकर निवृत्ती घ्यावी 

एका नेटकऱ्यांनी रोहित शर्माच्या फ्लॉप शोचा फोटो शेअर करत रोहित शर्मानं लवकरात लवकर निवृत्ती घ्यावी, असे कुणा कुणाला वाटते? असा प्रश्न उपस्थितीत करत भारतीय कर्णधारावर निशाणा साधला आहे. 

ना फिटनेस ना इंटेट असं म्हणत एकानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर रोहित शर्मानं निवृत्ती घ्यावी, असे मत व्यक्त केल्याचे दिसते.

रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीच्या संघात कोणत्या आधारावर घेतलं? त्याच्या कामगिरीनं टेन्शन वाढवलं आहे. १२ फेब्रुवारीपर्यंत संघ बदलण्याची वेळ आहे. शक्य असेल तर त्याला संघातून बाहेर काढा. अशा आशयासह एकाने थेट टीममध्ये मोठा बदल करून कॅप्टनला बाहेरचा रस्ता दाखवण्याचा सल्लाच दिल्याचे दिसून येते.

टॅग्स :रोहित शर्माभारत विरूद्ध इंग्लंड २०२५भारतीय क्रिकेट संघसोशल मीडियासोशल व्हायरल