Join us

IND vs BAN : Mohammed Shami ला नेमकं काय झालंय? BCCI ने अपडेट्स दिले अन् नव्या गोलंदाजाला संघात घेतले 

India vs Bangladesh : India tour of Bangladesh -भारतीय संघ सध्या तीन वन डे व दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी बांगलादेश दौऱ्यावर दाखल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 10:42 IST

Open in App

India vs Bangladesh : India tour of Bangladesh - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संपल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर वन डे व ट्वेंटी-२० मालिका खेळला. पण, त्यातील चार सामना पावसामुळेच रद्द करावे लागले आणि भारत व न्यूझीलंड यांनी अनुक्रमे ट्वेंटी-२० व वन डे मालिका १-० अशा फरकाने जिंकली. भारतीय संघ सध्या तीन वन डे व दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी बांगलादेश दौऱ्यावर दाखल झाला आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर विराट, रोहित, लोकेश, अश्विन यांनी विश्रांती घेतली होती आणि न्यूझीलंड दौऱ्यावर गेले नव्हते. आता विश्रांतीनंतर त्यांच्या वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेच्या तयारीला सुरुवात होणार आहे. उद्या सामना अन् आज मोहम्मद शमीने ( Mohammed Shami) मालिकेतून माघार घेतल्याची बातमी आली. 

सराव सत्र सुरू असताना शमीच्या खांद्याला दुखापत झाली आणि तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत बीसीसीआयच्या वैद्यकिय टीमच्या देखरेखीखाली उपचार घेतोय. त्यामुळे शमी तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत खेळणार नसल्याचे BCCI ने सांगितले आणि त्याच्याजागी उम्रान मलिकची वन डे संघात निवड झाली आहे.  

भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, उम्रान मलिक, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल. (  India's squad for Bangladesh ODIs: Rohit Sharma (C), KL Rahul (VC), Shikhar Dhawan, Virat Kohli, Rajat Patidar, Shreyas Iyer, Rahul Tripathi, Rishabh Pant (WK), Ishan Kishan (WK), Shahbaz Ahmed, Axar Patel, Washington Sundar, Shardul Thakur, Mohd. Siraj, Deepak Chahar, Kuldeep Sen, Umran Malik)  

बांगलादेशचा वनडे संघ - लिटन दास (कर्णधार), अनामूल हक, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहिम, नझमुल हुसैन शांतो, महमुदुल्लाह, नुरूल हसन, अफिफ हुसैन, यासिर अली, मेहदी हसन, मुस्तफिझूर रहमान, हसन महमूद, इबादोत हुसैन, नसुम अहमद, महमुदुल्ला. 

वन डे मालिकेचे वेळात्रकपहिली वन डे - ४ डिसेंबर - ढाकादुसरी वन डे - ७ डिसेंबर- ढाकातिसरी वन डे - १० डिसेंबर - चत्ताग्राम वन डे मालिकेचे सामने सकाळी ११.३० वाजल्यापासून सुरू होतील, तर कसोटीचे सामने सकाळी ९ पाहून खेळवण्यात येतील. सोन स्पोर्ट्स वर ही मालिका पाहता येणार आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशमोहम्मद शामीबीसीसीआय
Open in App