Join us

"मुझे अंदर से बहुत वो..."; 190 धावांवर असताना विराटला काय म्हणाला इशान किशन? स्वतःच केला खुलासा

याचा व्हिडिओदेखील बीसीसीआयने शेअर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 14:25 IST

Open in App

टीम इंडियाचा युवा फलंदाज इशान किशनने शनिवारी  धडाकेबाज फलंदाजी करत बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्यात यजमान संघाच्या गोलंदाजांना अक्षरशः फोडून काढले. चितगाव येथे झालेल्या या सामन्यात किशनने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक झळकावले. त्याने विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी 290 धावांची भागीदारी केली. या जोडीची ही आंतरराष्ट्रीय सामन्यातील खेळी पाहून चाहतेही खुश झाले. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत इशांन किशनला टीम इंडियात स्थान मिळाले होते आणि त्याने स्वत:ला अत्यंत चांगल्या प्रकारे सिद्ध केले.

गिलनं घेतली मुलाखत - इशान जेव्हा 190 धावांवर खेळत होता तेव्हा नर्व्हस होता? मध्येच विराट कोहली त्याला काय म्हणाला? इशान जेव्हा मोठ्या विक्रमाकडे वाटचाल करत होता, तेव्हा कोहली आणि इशान यांच्यात काय बोलणे झाले? हे काही असे प्रश्न आहेत, ज्यांचे उत्तर बहुतांश क्रिकेट प्रेमींना हवी आहेत. इशानने स्वतःच यावर भाष्य केले आहे. शुभमन गिलने सामन्यानंतर इशानची मुलाखत घेतली. याचा व्हिडिओदेखील बीसीसीआयने शेअर केला आहे. इशान किशनने केळ 126 चेंडूंमध्ये आपले द्विशतक पूर्ण केले आहे. हे एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान द्विशतक आहे.

विराट सोबत काय बोलला होता इशान किशन? -यावेळी इशान म्हणाला, 'सचिन तेंडुलकर, विरेंद्र सहवाग आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गजांच्या यादीत नाव आल्याने चांगले वाटत आहे.' यानंतर गिलने विचारले, जेव्हा आपण 200 च्या जवळ पोहोचला होता, तेव्हा विराट सोबत तू काय बोललास? यावर इशान म्हणाला, 'मी सर्वात पहिले सांगितले, की भाई मला सिंगल घेण्यासाठी बोलत राहा. नाही तर मी पुढे येऊन उडून देईन (चेंडू). मला आतून फार कसंसं होत आहे.'

'तर मारूनच खेळ...' -यानंतर गीलने विचारले, की आज तू पहिले सर्वात वेगवान द्विशत ठोकले. जे तुझ्या करीअरमधील पहिलेच शतकही आहे. तू काय विचार करून मैदानात उतरला होता. यावर इशान म्हणाला, 'नाही मी असा काही विचार करून मैदानात उतरलो नव्हतो. मी माझा स्कोर थेट 90 च्या जवळपास बघितला. यानंतर 146 वर बघितला आणि नंतर थेट 190 वर बघितला. मी काहीही विचार करत नव्हतो. मला वाटत होते, की विकेट एवढी छान असताना जबरदस्तीने स्वतःला रोखून का खेळावे. एवढी चांगली स्थिती असेल तर, मारूनच खेळूया.'

टॅग्स :इशान किशनभारत विरुद्ध बांगलादेशभारतीय क्रिकेट संघ
Open in App