Join us

IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट

सलामीवीर शादमान इस्लामनं १०१ चेंडूत केलेल्या ५० धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 12:26 IST

Open in App

IND vs BAN, 2nd Test Day 5 : कानपूर कसोटी सामन्यातील पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारतीय संघाने बांगलादेशचा दुसरा डाव  १४६ धावांत आटोपला. भारतीय संघाला ही कसोटी जिंकण्यासाठी फक्त ९५ धावांचे टार्गेट मिळाले आहे. जे टीम इंडिया अगदी सहज आणि सोपे आहे. सलामीवीर शादमान इस्लामनं १०१ चेंडूत केलेल्या ५० धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. बांगलादेशच्या दुसऱ्या डावात भारताकडून अश्विन रवींद्र जडेजा आणि बुमराह यांनी प्रत्येकी ३ -३ तर आकाश दीप याने एक महत्त्वाची विकेट घेतली 

अश्विन अन् जड्डूला मिळाली आकाश दीपची साथ 

पाचव्या आणि अखेरच्या दिवशी बांगलादेशच्या संघाने दुसऱ्या डावातील २ बाद २६ धावांवरुन खेळाला सुरुवात केली.  धावफलकावर ३६ धावा असताना अश्विननं मोमिनुल हक २(८) याच्या रुपात बांगलादेशच्या संघाला तिसरा धक्का दिला.  कर्णधार शान्तो आणि शादमान यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली. पण जड्डूनं कमालीची गोलंदाजी करत शान्तोच्या १९(३७) रुपात टीम इंडियाला चौथे यश मिळवून दिले. त्यानंतर टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट्स घेण्याचा सिलसिला कायम ठेवला. आकाश दीपनं अर्धशतक झळकावणाऱ्या सलामीवीर शादमान इस्लामला ५०(१०१) आपल्या जाळ्यात अडकवले. ही विकेट टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची होती.

जड्डूसमोर खातही उघडू शकला नाही शाकिब; बुमराहनं घेतली शेवटची विकेट

जड्डूनं लिटन दासच्या रुपात बांगलादेशला आणखी एक धक्का दिला. बांगलादेशचा हा स्टार बॅटर ८ चेंडू खेळून अवघ्या एका धावेची भर घालून चालता झाला. शाकिबला तर जड्डूनं घातही उघडू दिले नाही. दोन चेंडू खेळून तो बाद झाला.  बुमराहनं मेहदी हसन मिराज ९(१७) आणि तैजुल ० (१३) यांच्यासह   मुशफिकुर रहिमची विकेट घेत  बुमहारनं बांगलादेशचा दुसरा डाव खल्लास केला. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघबांगलादेशरवींद्र जडेजाआर अश्विनजसप्रित बुमराह