IND vs BAN 2nd ODI Live : विराट कोहली बेक्कार पद्धतीने आऊट झाला, गोलंदाज सॅल्यूट करण्यासाठी बाऊंड्रीपर्यंत गेला, Video 

कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) च्या बोटाला दुखापत झाली आणि तो मालिकेलाच मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 05:19 PM2022-12-07T17:19:15+5:302022-12-07T17:19:37+5:30

whatsapp join usJoin us
IND vs BAN 2nd ODI Live :  Virat Kohli dismissed for 5 in 6 balls, INDIA 39/3 in 10 overs vs BANGLADESH (TARGET: 272), Video | IND vs BAN 2nd ODI Live : विराट कोहली बेक्कार पद्धतीने आऊट झाला, गोलंदाज सॅल्यूट करण्यासाठी बाऊंड्रीपर्यंत गेला, Video 

IND vs BAN 2nd ODI Live : विराट कोहली बेक्कार पद्धतीने आऊट झाला, गोलंदाज सॅल्यूट करण्यासाठी बाऊंड्रीपर्यंत गेला, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Bangladesh 2nd ODI Live Updates : बांगलादेश दौऱ्यावर जाणे भारताला चांगलेच महागात पडलेले दिसतेय.  कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) च्या बोटाला दुखापत झाली आणि तो मालिकेलाच मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मेहिदी हसन मिराज व महमदुल्लाह या बांगलादेशी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. ६ बाद ६९ धावांवरून त्यांनी संघाला २७० पार नेले आणि प्रत्युत्तरात भारताने तीन फलंदाज स्वस्तात गमावले. विराट कोहली बेक्कार पद्धतीने आऊट झाला. 

मोहम्मद सिराज, उम्रान मलिक व वॉशिंग्टन सुंदर यांनी बांगलादेशची अवस्था दयनीय केली होती. अनामुल हक ( ११), लिटन दास ( ७), नजमूल शांतो ( २१), शाकिब अल हसन ( ८ ), मुश्फीकर रहिम ( १२) व आफिफ होसैन ( ०) हे सहा फलंदाज अवघ्या ६९ धावांवर माघारी परतले. दुसऱ्याच षटकात रोहित शर्माला स्लीपमध्ये झेल घेताना डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले. तो आजची मॅच खेळण्याची शक्यता कमीच आहे. 


पहिल्या सामन्यातील नायक मेहिदी हसन मिराज याने पुन्हा एकदा भारताची डोकेदुखी वाढवली आणि यावेळेस त्याला महमुदुल्लाहच्या अनुभवाची साथ मिळाली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी १४८ धावा जोडल्या. महमुदुल्लाह ९६ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ७७ धावांवर तंबूत परतला. लोकेश राहुलने अफलातून झेल घेतला.  मेहिदी व नसून अहमद यांनी २२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. मेहिदीने अखेरच्या षटकांत १५ धावा करून वन डेतील पहिले शतक पूर्ण केले. त्याने ८३ चेंडूंत शतक पूर्ण करताना बांगलादेशला ७ बाद २७१ धावांचा डोंगर उभारून दिला. त्याने ८ चौकार व ४ षटकार खेचून नाबाद १०० धावा केल्या. 

रोहितच्या अनुपस्थितीत विराट कोहलीशिखर धवन ही जोडी सलामीला आली. विराटने चौकाराने खाते उघडले, परंतु इबादत होसैनच्या चेंडूवर पुल मारण्याच्या प्रयत्नात तो त्रिफळाचीत झाला. विराट ( ५), धवन ( ८) व वॉशिंग्टन सुंदर ( ११) माघारी परतल्याने भारताची अवस्था ३ बाद ३९ अशी झाली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IND vs BAN 2nd ODI Live :  Virat Kohli dismissed for 5 in 6 balls, INDIA 39/3 in 10 overs vs BANGLADESH (TARGET: 272), Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.