Join us

IND vs BAN 2nd ODI Live : नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने; दोन बदलांसह टीम इंडिया मैदानावर

India vs Bangladesh 2nd ODI Live Updates : पहिल्या सामन्यात मार खाल्ल्यानंतर भारतीय संघ मालिका वाचवण्याच्या निर्धाराने आज  मैदानावर उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 11:08 IST

Open in App

India vs Bangladesh 2nd ODI Live Updates : पहिल्या सामन्यात मार खाल्ल्यानंतर भारतीय संघ मालिका वाचवण्याच्या निर्धाराने आज  मैदानावर उतरणार आहे. त्यात दुखापतीचे ग्रहण काही केल्या पाठ सोडेना झालेय... पहिल्या वन डे आधी रिषभ पंतने मालिकेतून माघारी घेतली, तत्पूर्वी मोहम्मद शमी बाहेर झालाच होता.. अक्षर पटेललाही सराव सत्रात दुखापत झाल्याने पहिल्या सामन्यात त्याला खेळता आले नव्हते. शार्दूल ठाकूरलाही पहिल्या सामन्यात दुखापत झालीय आणि आज त्याची खेळण्याची शक्यता कमी आहे. अशात १-० अशी आघाडी घेतलेल्या बांगलादेशचा सामना करायचा कसा, हा प्रश्न कर्णधार रोहित शर्माला पडला आहे.

  • भारताच्या २०१५ साली बांगलादेश दौऱ्यातील पहिली वन डे लढत येथे झाली होती आणि मुस्ताफिजूर रहमानने पदार्पणाच्या त्या सामन्यात पाच विकेट्स घेतल्या होत्या. २०२२च्या दौऱ्यातील पहिल्या लढतीत रहमानला विकेट घेता आली नाही, परंतु त्याच्या नाबाद १० धावा निर्णायक ठरल्या
  • शाकिब अल हसन व इबादत होसैन यांनी वन डे क्रिकेटमध्ये पहिल्या वन डे सामन्यात ४+ विकेट्स घेतल्या आणि बांगलादेशी गोलंदाजांनी एकाच वन डेत अशी कामगिरी चौथ्यांदा केली आहे. 
  • आज विराट कोहलीने २१ धावा केल्या तर तो बांगलादेशमध्ये वन डेत १००० धावांचा टप्पा पार करेल. पाहुण्या फलंदाजांत कुमार संगकारा १०४५ धावांसह आघाडीवर आहे. विराटने ७५.३०च्या सरासरीने ९७९ धावा केल्या आहेत. 

 

बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याने पुन्हा नाणेफेक जिंकली, परंतु यावेळी त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या संघात दोन बदल झाले आहेत. अक्षर पटेल व उम्रान मलिक यांची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली असून शाहबाद अहमद व कुलदीप सेन यांना बाहेर जावे लागले आहे.     

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशअक्षर पटेल
Open in App