बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पर्थ कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पर्थच्या मैदानात उतरण्याआधी कार्यवाहून कर्णधार बुमराहनं पत्रकारांसमोर 'बोलंदाजी' केली. नियमित कर्णधार रोहितच्या अनुपस्थितीत गोलंदाजीशिवाय सर्वोत्तम नेतृत्व करुन दाखवण्याचे चॅलेंज बुमराहसमोर आहे. याआधी पत्रकार परिषदेत संवाद साधताना त्याने पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी एक सीन असा घडला ज्यावेळी आपल्या 'बोलंदाजी'त बुमराहनं रिपोर्टरलाच खतरनाक यॉर्कर मारल्याचे पाहायला मिळाले. नेमकं काय झालं? जसप्रीत बुमराह पत्रकाराला काय म्हणाला? त्यासंदर्भातील सविस्तर माहिती.
पत्रकारानं बुमराहला लावला हा टॅग
सध्याच्या घडीला जसप्रीत बुमराह क्रिकेट जगतातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. तो आपल्या परफेक्ट यॉर्कर लेंथ चेंडूसह गतीने प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना चकवा देण्यात माहीर आहे. पण पर्थ सामन्याआधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकराने बुमराहला कॅप्टन्सीसंदर्भातील प्रश्न विचारताना मध्यम जलगती गोलंदाज असा उल्लेख केला. ही गोष्ट बुमराहला चांगलीच खटकली. त्यावर त्याने हसत हसत कडक रिप्लायही दिल्याचे पाहायला मिळाले.
मग भारतीय कार्यवाहू कॅप्टनचा आला कडक रिप्लाय
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज असलेल्या बुमराहला एका पत्रकाराने प्रश्न विचारताना म्हटले की, एक मध्यम जलगती गोलंदाजाच्या रुपात कॅप्टन्सी मिळाल्यावर कसं वाटतं? यावर बुमराहनं आपण किती वेगाने चेंडू टाकतो हे सांगत संबंधित पत्रकाराची शाळा घेतली. "यार मी १५० kmph वेगाने चेंडू टाकतो. त्यामुळे तू मला जलदगती गोलंदाज असं म्हणू शकतो," असा रिप्लाय दिला. जो बुमराहच्या यॉर्कर लेंथ चेंडू इतकाच कडक होतो.
बुमराहनं ऑस्ट्रेलियालाही दिली वॉर्निंग
भारतीय संघ जोमाने मैदानात उतरेल, असा इशाराच जसप्रीत पर्थ कसोटी आधी दिला आहे. तो म्हणाला की, "आम्ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर लवकर पोहचून उत्तम तयारी केली आहे. याआधी आम्ही सरावासाठी कमी वेळ मिळाल्यानंतरही जिंकलो आहे. यावेळी अधिक वेळ मिळाल्यामुळे त्यापेक्षा चांगली कामगिरी करू." असे बुमराहनं म्हटले आहे.