Join us  

1 मॅच, 2 टीम अन् 70 हजार कोटींचा खेळ; भारत-ऑस्ट्रेलिया फायनलवर सट्टे बाजाराच्या नजरा

IND vs AUS WC 2023 Final: भारत-ऑस्ट्रेलियात अंतिम सामन्यावर जगभरातील क्रिकेटप्रेमींसह सट्टे बाजाराचेही या सामन्यावर विशेष लक्ष आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 4:07 PM

Open in App

IND vs AUS WC 2023 Final: गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. या सामन्याची पूर्ण तयारी झाली आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमींसह सट्टे बाजाराचेही या सामन्यावर विशेष लक्ष आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावर सुमारे 70 हजार कोटी रुपयांचा सट्टा लावण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट विश्वचषकादरम्यान सट्टेबाजीचे सर्व रेकॉर्ड मोडले गेले आहेत. वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात आतापर्यंत 70 हजार कोटी रुपयांचा सट्टा लावण्यात आला आहे. याआधी भारत-पाकिस्तान सामन्यावर 40 हजारांचा सट्टा लावला गेला होता. गेल्या आठवड्यात जगभरातील अनेक सट्टा प्लॅटफॉर्म अॅक्टिव्ह झाले आहेत.

500 वेबसाइट्स-300 अॅप्समिळालेल्या माहितीनुसार, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यादरम्यान 500 हून अधिक बेटिंग वेबसाइट आणि सुमारे 300 मोबाइल अॅप अॅक्टिव्ह झाले आहेत. या सर्व अॅप्स आणि वेबसाइट्सवरील बुकींनी बेटिंग लाईन ओपन केली आहे. यामुळे हजारो-लाखो लोक यावर सट्टा लावत आहेत. नाणेफेक कोण जिंकेल, कोणता संघ किती घावा करेल, कोणता खेळाडू किती धावा आणि किती विकेट घेईल, कोणता संघ अंतिम सामना जिंकेल, अशा विविध गोष्टींवर सट्टा लावला जात आहे. 

सट्ट्याचे रेट कसे ठरले?अंतिम सामन्यादरम्यान टीम इंडियाच्या विजयावर 20 पैशांचा तर ऑस्ट्रेलियावर 35 पैशांचा सट्टा लावण्यात आला आहे. याचा सरळ अर्थ असा की बुकींचा ऑस्ट्रेलियापेक्षा टीम इंडियावर जास्त विश्वास आहे. बुकींना विश्वास आहे की, टीम इंडिया नाणेफेक जिंकणार आहे, म्हणून टीम इंडियावर 25 पैशांची तर ऑस्ट्रेलियावर 40 पैशांची पैज लावण्यात आली आहे. 

 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारतआॅस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघव्यवसाय