IND vs AUS Suryakumar Yadav Trolls Abhishek Sharma Over Low Strike Rate : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा आणि अखेरचा टी-२० सामना ब्रिस्बेनच्या द गाबा स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि युवा सलामीवीर अभिषेक शर्मा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ भारतीय संघाचा कर्णधार युवा फलंदाजाची स्लो स्ट्राइक रेटवरुन थट्टा करताना पाहायला मिळते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...अन् सूर्या भाऊनं केली स्फोटक बॅटरच्या बॅटिंगची थट्टा
अभिषेक शर्मा भारतीय टी-२० संघाच्या डावाची सुरुवात करताना प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजावर तुटून पडण्यासाठी ओळखला जातो. पण चौथ्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्मा धमाकेदार खेळी करण्यात कमी पडला. या सामन्यात त्याने २१ चेंडूत २८ धावा केल्या. बहुतांश सामन्यात २०० आसपासच्या स्ट्राइक रेटनं धावा काढणाऱ्या अभिषेकचे चौथ्या टी-२० सामन्यातील स्ट्राइक रेट १३३.३३ इतके होते. याच मुद्यावरून सूर्यकुमार यादवनं युवा बॅटरची थट्टा केल्याचे पाहायला मिळाले.
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
अभिषेक या दौऱ्यातही टॉपर! कशी राहिलीये सूर्यकुमार यादवची कामगिरी
अभिषेक शर्मा हा सातत्याने दमदार कामगिरी करून दाखवत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी-२० मालिकेतही सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आघाडीवर दिसतो. ४ सामन्यातील ४ डावात त्याने एका अर्धशतकाच्या मदतीने जवळपास १५९ च्या स्ट्राइक रेटनं १४० धावा केल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ शुभमन गिल एकमेव असा बॅटर आहे ज्याने या मालिकेत शंभरीचा आकडा गाठला आहे. सूर्यकुमार यादवच्या या दौऱ्यातील कामगिरीबद्दल बोलायचं तर ४ सामन्यातील ४ डावात त्याने १७१.४३ च्या सरासरीनं ८४ धावा काढल्या आहेत.
स्ट्राइक रेटच्या बाबतीत वॉशिंग्टन सुंदर ठरला सगळ्यात भारी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जिथं अभिषेक शर्मा स्ट्राइक रेटच्या बाबतीत कमी पडला तिथं भारताच्या ताफ्यातून अष्टपैलू वॉशिंग्ट सुंदरनं मैफील लुटल्याचे पाहायला मिळाले. वॉशिंग्टन सुंदरनं २ सामन्यातील २ डावात ६१ च्या सर्वोत्तम सरासरीसह २०० पेक्षा अधिकच्या सरासरीनं धावा केल्या आहेत. भारतीय संघाला मालिकेत सलग दोन विजय मिळवून देण्यात त्याची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली.